TRENDING:

Thane-Navi Mumbai Airport: ठाणे ते नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत! विमानतळाकडे जाण्यासाठी 6 हजार कोटींच्या एलिव्हेटेड रोडला मंजुरी

Last Updated:

Thane-Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली भागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ उभारलं जात आहे. या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. याठिकाणाची रस्ते मार्गे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी विविध पर्याय शोधले जात आहे. याअंतर्गत ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 25.2 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गासाठी 6 हजार 363 कोटी रुपये खर्च होणार आहे. यामुळे संपूर्ण महानगर प्रदेशातील प्रवाशांची सोय होईल. या एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे मुंबई आणि ठाण्यातून नवी मुंबईत जाण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी लागेल.
Thane-Navi Mumbai Airport: ठाणे ते नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत! विमानतळाकडे जाण्यासाठी 6 हजार कोटींच्या एलिव्हेटेड रोडला मंजुरी
Thane-Navi Mumbai Airport: ठाणे ते नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत! विमानतळाकडे जाण्यासाठी 6 हजार कोटींच्या एलिव्हेटेड रोडला मंजुरी
advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोने ठाणे ते नवी मुंबई विमानतळादरम्यान एलिव्हेटेड कॉरीडॉरसाठी 'अर्बन मास ट्रान्झिट कंपनी'च्या मार्फत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. 25.2 किलोमीटर लांबीच्या सहा लेनच्या एलिव्हेटेड रोडची, ठाणे ते प्रस्तावित ठाणे कोस्टल रोड भाग दोन आणि कोपरी पटणी पुलामार्गे थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवास करण्याच्या दृष्टीने आखणी केली आहे.

advertisement

Mumbai Traffic: ऐतिहासिक पूल पाडण्यास सुरुवात, एका दिवसात दिसले भयंकर परिणाम, वाहतूक पोलिसांची उडाली तारांबळ

नवी मुंबई विमानतळाचं महत्त्व लक्षात घेता विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील विकासात आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली आदी भागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. त्यासाठी महानगर प्रदेश क्षेत्रातील विविध भागांना नवी मुंबई विमानतळाशी जोडणं गरजेचं असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पायाभूत प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

advertisement

या रस्त्यांना जोडणार एलिव्हेडेट कॉरीडॉर

समोर आलेल्या माहितीनुसार, या कॉरीडॉरमध्ये सहा प्रमुख इंटरचेंज असतील. हे इंटरचेंज कोपरी पटणी पूल, घणसोली-ऐरोली खाडी पूल, कांजुरमार्ग-कोपरखौरणे लिंक रोड, वाशी येथील सायन-पनवेल हायवे, पाम बीच मार्ग आणि उलवे कोस्टल रोड या प्रमुख रस्त्यांना जोडले जातील. मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण भागाला जोडला जाईल. हा एलिव्हेडेट मार्ग उलवे कोस्टल रोडला जोडला जाईल. पुढे एका एलिव्हेडेट रोडने नवी मुंबई विमानतळ टर्मिनल्सला जोडला जाईल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane-Navi Mumbai Airport: ठाणे ते नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत! विमानतळाकडे जाण्यासाठी 6 हजार कोटींच्या एलिव्हेटेड रोडला मंजुरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल