Mumbai Traffic: ऐतिहासिक पूल पाडण्यास सुरुवात, एका दिवसात दिसले भयंकर परिणाम, वाहतूक पोलिसांची उडाली तारांबळ

Last Updated:

Mumbai Traffic: परळ स्थानकावर उतरून प्रभादेवी पुलाचा वापर करून दोन्ही दिशेला जाणे नागरिकांसाठी सोयीचं होतं.

Mumbai Traffic: ऐतिहासिक पूल पाडण्यास सुरुवात, एका दिवसात दिसले भयंकर परिणाम, वाहतूक पोलिसांची उडाली तारांबळ
Mumbai Traffic: ऐतिहासिक पूल पाडण्यास सुरुवात, एका दिवसात दिसले भयंकर परिणाम, वाहतूक पोलिसांची उडाली तारांबळ
मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्टेशनवरील ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल (प्रभादेवी पूल) अखेर इतिहास जमा होणार आहे. या 125 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचं शुक्रवारी (12 सप्टेंबरपासून) रात्रीपासून पाडकाम सुरू झालं आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक इतर ठिकाणांहून वळवण्यात आली आहे. एल्फिन्स्टन पूल बंद झाल्याने दादरच्या टिळक आणि परळच्या करी रोड पुलावर वाहतुकीचा भार वाढला आहे. परिणामी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एल्फिन्स्टन पुलामुळे परळ आणि प्रभादेवी परिसर एकमेकांशी सव्वाशे वर्षांहून जास्त काळापासून जोडले गेले होते. लोअर परळ परिसरात सरकारी रुग्णालये, शाळा, महाविद्यालये यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर, प्रभादेवी परिसरात हॉटेल्स, मॉल्स आणि बाजारपेठा आहेत. परळ स्थानकावर उतरून प्रभादेवी पुलाचा वापर करून दोन्ही दिशेला जाणे नागरिकांसाठी सोपं होतं. आता मात्र त्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
advertisement
शिवाय, टिळक आणि करी रोड पुलांवरील वाहनांची संख्या नेहमीपेक्षा चौपट झाली आहे. या दोन्ही ठिकाणी वाहनांची गर्दी नियंत्रण करताना वाहतूक पोलिसांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसलं. उपनगरातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत प्रभादेवी पुलावरून केईएम, वाडिया, टाटा या रुग्णालयांत जाणं सोपं पडत होतं. आता याच अंतरासाठी दादरच्या टिळक पूल किंवा करी रोड पुलाचा वापर करून अर्धा पाऊण तास खर्च करून वळसा मारावा लागणार आहे.
advertisement
'अटल सेतू'वरून आलेल्या वाहनांना विनाअडथळा थेट वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्र्याला जाता यावं यासाठी 'एमएमआरडीए'कडून 4.5 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग उभारला जाणार आहे. सध्याच्या पुलाच्या जागी स्थानिक वाहतुकीसाठी पुलाची उभारणी करून, त्यावरून वरळी-शिवडी मार्ग जाणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Traffic: ऐतिहासिक पूल पाडण्यास सुरुवात, एका दिवसात दिसले भयंकर परिणाम, वाहतूक पोलिसांची उडाली तारांबळ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement