नाशिक : राज्यात महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मराठी माणसासाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू आता आपली पहिली सभा नाशिकमध्ये घेणार आहे. थोड्याच वेळात नाशिकमध्ये ही सभा सुरू होणार आहे. पण, नाशकात ठाकरे बंधूंच्या सभेच्या व्यासपीठावर महापुरुषांच्या सोबत आनंद दिघे यांचीही प्रतिमा ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीत ही पहिलीच सभा आहे. सभेच्या ठिकाणी व्यासपीठावर महापुरुषांच्या सोबत आनंद दिघे यांचीही प्रतिमा ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे.
advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह छत्रपती शाहू, फुले दाम्पत्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे आणि आनंद दिघे यांची प्रतिमा आहे.
आज ठाकरे बंधूंची नाशकात पहिली संयुक्त सभा आहे. राज्यातील पहिलीच ठाकरेंची सभा होत आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आनंद दिघे यांचा फोटो पाहण्यास मिळाला. आनंद दिघे यांची प्रतिमा आता ठाकरे बंधूंच्या व्यासपीठावर देखील बघायला मिळत आहे.
