TRENDING:

Ashok Kharat Case: अवघी ७ मिनिटांची सुनावणी अन् खरातचा गेम फिरला! कोर्टात नेमकं काय घडलं? एसआयटीचा 'प्लॅन बी' अॅक्टिव्ह

Last Updated:

Nashik News: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आज न्यायालयात एक वेगळे वळण घेतले. खरातची पोलीस कोठडी संपल्याने आज त्याला नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आज न्यायालयात एक वेगळे वळण घेतले. खरातची पोलीस कोठडी संपल्याने आज त्याला नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र, आजची सुनावणी अवघ्या ७ मिनिटांत आटोपली. न्यायालयाने खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असली, तरी खरातची अडचण संपलेली नाही, उलट तो दुसऱ्या गुन्ह्यात अधिकच अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अवघी ७ मिनिटांची सुनावणी अन् खरातचा गेम फिरला! कोर्टात नेमकं काय घडलं? एसआयटीचा 'प्लॅन बी' अॅक्टिव्ह
अवघी ७ मिनिटांची सुनावणी अन् खरातचा गेम फिरला! कोर्टात नेमकं काय घडलं? एसआयटीचा 'प्लॅन बी' अॅक्टिव्ह
advertisement

७ मिनिटांत सुनावणी पूर्ण, पण सस्पेन्स कायम!

आज न्यायालयात कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. यापूर्वी तीन वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर, आज सरकारी पक्षाने अधिकची कोठडी मागितली नाही. परिणामी, न्यायालयाने खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. यामुळे तांत्रिकदृष्ट्या खरातच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा रंगली असली, तरी एसआयटीने (SIT) खरातची नाकेबंदी करण्याची पूर्ण तयारी केली आहे.

advertisement

पोलीस कोठडीसाठी एसआयटीनं 'फिल्डिंग' लावली

आज जरी खरातला न्यायालयीन कोठडी मिळाली असली, तरी उद्या म्हणजेच गुरुवारी (२ एप्रिल) त्याला एका दुसऱ्या गंभीर गुन्ह्यात पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ७६/२०२६ या क्रमांकाच्या गुन्ह्यांत पुन्हा एसआयटी त्याला कोर्टात खेचणार आहे. या दुसऱ्या गुन्ह्यात खरातला पुन्हा पोलीस कोठडीत खेचण्यासाठी एसआयटीने जोरदार 'फिल्डिंग' लावली आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत खरातला काय शिक्षा मिळणार आणि पीडित महिलांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

advertisement

मोबाईल डेटामध्ये राजकीय 'कनेक्शन'चा स्फोट?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

तपासादरम्यान अशोक खरातच्या मोबाईलमधील 'डेटा रिकव्हर' करण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खरातने अनेक बड्या राजकीय व्यक्तींचे मोबाईल नंबर दुसऱ्याच नावांनी सेव्ह केल्याचा संशय पोलिसांना आहे. खरात तपासात सहकार्य करत नसला, तरी डिजिटल पुराव्यांनी त्याची चांगलीच गोची केली आहे. खरातच्या मुलाला पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. तर, त्याची पत्नी ही पसार झाली आहे. पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: अवघी ७ मिनिटांची सुनावणी अन् खरातचा गेम फिरला! कोर्टात नेमकं काय घडलं? एसआयटीचा 'प्लॅन बी' अॅक्टिव्ह
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल