महिला लैंगिक शोषण आणि लोकांची तंत्रमंत्रच्या नावाखाली फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अशोक खरातने जवळपास १०० हुन महिलांचे शोषण केल्याचा संशय आहे. तर, दुसरीकडे लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप आहे. बुधवारी, अशोक खरातला एका प्रकरणात न्यायलयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज आणखी एका प्रकरणात खरातला कोर्टात आज हजर करण्यात आले. आजची सुनावणी व्हीसी द्वारे झाली. यावेळी कोर्टात तीन स्क्रिन लावण्यात आल्या होत्या. यातील एका स्क्रिनवर कोठडीत असलेला खरात दिसत होता.
advertisement
भोंदूबाबा अशोक खरातने एका महिलेचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर पीडितेचा गर्भपातही केला. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. बुधवारी खरातला न्यायलयीन कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातला या प्रकरणात आज पुन्हा कोर्टात हजर करत पोलीस कोठडीची मागणी केली.
सरकारी वकिलांनी काय म्हटले?
आजच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी गंभीर आरोप करत काही मुद्यांच्या तपासासाठी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीची लैंगिक शोषण करण्याची मोडस ऑपरेंडिटी होती, गर्भपात करण्यासाठीचे औषध कुठून आणले, पीडित महिलेच्या आई वडिलांना त्याने धमकावले, आधार कार्ड पॅन कार्ड कशासाठी घेतले ? त्याचे काय केले ? आरोपी हा मास्टर माईंड असून तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. आरोपी कोणते औषध वापरत होता, मंतरलेल्या पाण्यामध्ये काय टाकत होता हे तपासायचे आहेत, त्यासाठी तपास करायचा आहे, गंभीर गुन्हा असल्यानं तपास करायचा आहे 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
खरातच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
आरोपी खरातचे वकील अॅ़ड. भाटे यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, पहिल्या गुन्ह्यात ७ दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती, दुसऱ्या गुन्ह्यात पण तेच आहे ,१४ दिवसांत या गुन्ह्यांचा तपास झाला आहे, जबाब झाला आहे, रिमांड रिपोर्ट मध्ये मांडले आहे, २०२०२ ते २०२६ मध्ये जे घडले ते ग्राउंड रिपोर्ट मध्ये आले आहे, त्यात मला वाचायला दिले नाही, सारखेच ग्राउंड रिपोर्ट मांडत आहे. मला FIR वाचायला मिळाली नाही, गर्भपात करण्यासाठी कायदा आहे त्यानुसार काही केलं आहे का? जादूटोणा कायदा लावला त्याबाबत तपास केला आहे, सगळे व्हिडीओ जनमानसात गेले, त्यानुसार बलात्कार आणि जादूटोणा केला असे काय आधारावर आरोप, त्याचे कारणे मांडावी, दैव शक्ती होती त्याचे प्रलोभने द्यायचा आणि मग अत्याचार करायचा असे त्यात नमूद आहे, त्यानुसार पीडित महिलेचे जबाब घेतले आहे, पाण्यात काय मिसळले त्यात तपास बाकी असे काय? त्यामुळे पोलीस कस्टडी देऊ नका असे खरातच्या वकिलांनी म्हटले.
खरातची सुटका नाहीच...
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं अशोक खरातला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अशोक खरात हा ८ एप्रिलपर्यंत आता पोलीस कोठडीत असणार आहे. या कालावधीत पोलिसांना खरातकडून महत्त्वाची माहिती, धागेदोरे जमवावे लागणार आहेत.
