छत्रपती संभाजीनगर : चातुर्मास सुरू झाला की सर्व सणावारांना सुरुवात होते आणि सणवार सुरू की तळणीचे पदार्थ करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. पण अशातच आता सध्या तेलाचे भाव वाढल्याचे दिसून येत आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने एक विशेष आढावा घेतला.
छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये देखील तेलाचे भाव वाढलेले आहेत. तेलाचे भाव किती रुपयांनी वाढलेले आहेत, काय किमती आहेत, याचबाबत तेल व्यापारी अशोक मिटकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
विश्व भ्रमण दिंडीचे आयोजन, मलेशियात घुमला हरीनामाचा गजर, डोळे दिपवणारा सोहळा, VIDEO
सध्या सोयाबीन तेल, पामतेल, शेंगदाणा तेलाचे भाव स्थिर आहेत. मात्र, करडीच्या तेलाचे भाव हे वाढलेले आहेत. करडीची आवक कमी झाल्यामुळे करडीच्या तेलाचे भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तब्बल 25 ते 30 रुपयांनी या तेलामध्ये भाव वाढ झाली आहे. अजूनही जर करडीची आवक झाली नाही तर हे भाव वाढण्याची शक्यता आहे. 15 दिवसांपूर्वी तेलाचे भाव हे 170 ते 185 रुपये होते. पण आता 200 रुपयांवर या करडीच्या तेलाचे भाव गेले आहेत.
श्रावणात घरी करायचंय शिवलिंग स्थापन? 4 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर घडेल चूक
इतर तेलाचे भाव बघायला गेले तर साधे शेंगदाणा तेल 180 रुपये व डबल फिल्टर्ड तेल 185 रुपये, तीळ तेल 200 रुपये, सोयाबीन तेल 105 रुपये, सरकी रिफाईंड 105 रुपये, सूर्यफूल तेल 110 रुपये, तर पाम तेलाचा भाव लिटरमागे 100 रुपये आहे. सध्याला हे भाव स्थिर आहेत. पण यांची पण आवक जर कमी झाली किंवा मागणी वाढली तर तेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे, असे व्यापारी अशोक मिटकर यांनी सांगितले आहे.