छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर शहर ही पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. शहरात पर्यटनस्थळ बघण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यामुळे शहरात स्मार्ट सिटी बस या चालवल्या जातात. शहरांमध्ये दररोज 90 स्मार्ट सिटी बस चालवण्यात येतात. ही स्मार्ट सिटी बस शहरातील नागरिकांना मोठा दिलासा आहेच. पण त्यासोबतच जे शहरामध्ये पर्यटक येतात त्यांनाही याचा खूप मोठा फायदा होतो.
advertisement
स्मार्ट सिटी बस साठी आता 'चलो ॲप' सर्व नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे. या ॲपमुळे नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. या ॲपवर तुम्ही घरबसल्या स्मार्ट सिटी बस तिकीट आणि पास घरबसल्या बुकिंग करू शकता. या ॲपमधून तुम्हाला तुमची स्मार्ट सिटी बस कुठे आहे तिला स्टॉपला यायला किती वेळ लागेल, या सर्व गोष्टी या ॲपद्वारे माहिती होईल.
चलो ॲप हे तुम्ही गुगल प्ले स्टोअर डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच तुम्हाला एक स्मार्ट कार्डदेखील हे स्मार्ट सिटी बस करून देण्यात येणार आहे.
चलो ॲप हे सर्व नागरिकांसाठी अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी हे ॲप डाऊनलोड करून त्याचा फायदा झाला, असं आवाहन नागरिकाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Vegetables price : भाज्या महागल्या, पुण्यात किलोचे दर शंभरी पार, काय आहे नेमकं कारण?
चलो ॲपचे फायदे - घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने स्मार्ट सिटी बसचे पास हे काढू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता. त्यासाठी नेट बँकिंग डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून देखील पेमेंट करू शकता. ज्याठिकाणी स्मार्ट सिटी बसचा स्टॉप आहे त्याठिकाणी बस किती वेळा येते, हे तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून कळेल.