मंत्रालयात काम असणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! थेट स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी बससेवा, अशी राहणार वेळ

Last Updated:

आता एसटीच्या या सेवेमुळे मंत्रालय, विधिमंडळ, उच्च न्यायालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या परिसरात काम करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

मंत्रालयात काम असणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी
मंत्रालयात काम असणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी
पियूष पाटील, प्रतिनिधी
मुंबई : दररोज हजारो चाकरमानी, मंत्रालयातील शासकीय कामांसाठी तसेच मंत्रालयातील कामांव्यतिरिक्त इतर कामांसाठी नागरिक मुंबई ते पुणे असा प्रवास करत असतात. या प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
एसटी महामंडळाने स्वारगेट-मंत्रालय-स्वारगेट, अशी शिवनेरी बससेवा मंगळवारपासून सुरू केली आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी ही बस सेवा सुरू राहणार आहे. या शिवनेरी बसचा प्रवास अटल सेतू मार्गे होणार आहे. अटल सेतूमुळे प्रवासाचे अंतर बऱ्यापैकी कमी झाले आहे. आता या मार्गावरून एसटी महामंडळाच्या बस धावू लागल्या आहेत.
advertisement
अटल सेतूच्या मार्गाने पुणे ते दादर हे अंतर वाशी, कळंबोली मार्गापेक्षा पाच किलोमीटरने कमी भरते. याशिवाय, वाहतूक कोंडीची समस्या विचारात घेतल्यास शिवनेरी बस अटल सेतूवरुन नेल्यास प्रवासाचा वेळ साधारण तासाभराने कमी झाला आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुणे ते दादर, अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना आता मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालय-स्वारगेट बसची मागणी केली होती. त्यानुसार ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
advertisement
Vegetables price : भाज्या महागल्या, पुण्यात किलोचे दर शंभरी पार, काय आहे नेमकं कारण?
सोमवारी मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी नोकरीसाठी तसेच सर्वसामान्य नागरिक कामासाठी मंत्रालयात येतात. त्यांना थेट मंत्रालयाजवळ सोडणारी बससेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यामुळे दादर किंवा मुंबई बसस्थानकावरून त्यांना मंत्रालय गाठावे लागायचे. आता एसटीच्या या सेवेमुळे मंत्रालय, विधिमंडळ, उच्च न्यायालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या परिसरात काम करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
advertisement
तिकिट दरात सवलत -
महिलांना आणि 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना तिकीट दरात 50 टक्के तर 75 वर्षांवरील ज्येष्ठांना 100 टक्के सवलत आहे.
तिकीट दर किती?
फुल : 565
हाफ : 295
advertisement
या वेळेत असेल गाडी -
सोमवारी : स्वारगेट ते मंत्रालय सकाळी 6 वाजता
शुक्रवारी : मंत्रालय ते स्वारगेट सायंकाळी साडेसहा वाजता
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मंत्रालयात काम असणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! थेट स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी बससेवा, अशी राहणार वेळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement