चक्क डोंगर फोडून सफरचंदाची शेती, कन्नडमधील शेतकरी बनला इतरांसाठी प्रेरणा!, नेमकं काय केलं?

Last Updated:

डॉ. सीताराम जाधव असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. ते मूळचे पैठण तालुक्यातील कचनेरे या गावचे रहिवासी आहे. त्यांचे आई वडील शेतकरी होते.

+
डोंगर

डोंगर फोडून सफरचंदाची शेती

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सफरचंदाची शेती म्हटलं तर आपल्याला काश्मिर आठवते. मात्र, मराठवाडा म्हटलं तर दुष्काळ डोळ्यासमोर येतो. पण याच दुष्काळी भागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने डोंगर फोडून तब्बल 70 एकर शेती तयार केली.
खडकावर धरणातील मती टाकून शेतात सेंद्रिय सफरचंदची बाग फुलवले आहे. शेतकऱ्याने केलेली ही आधुनिक शेती केली. ही शेती आता मराठवाड्यातील अनेक तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
advertisement
डॉ. सीताराम जाधव असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. ते मूळचे पैठण तालुक्यातील कचनेरे या गावचे रहिवासी आहे. त्यांचे आई वडील शेतकरी होते. डॉ. सीताराम यांनी हलाखीच्या परिस्थितीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केले. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली.
advertisement
Satara Police Bharti 2024 : बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांची गैरसोय टळणार, याठिकाणी झाली राहण्याची सोय
त्यानंतर त्यांनी शेती करायचा निर्णय घेतला. कन्नड शहराजवळ डोंगर असल्यामुळे त्याठिकाणी पिक उगवणार नाही हे त्यांना माहिती होते. तरीही या डोंगर भागामध्ये 70 एकर जागा घेतली. तसेच त्या ठिकाणचा डोंगर जेसीबीच्या साहाय्याने फोडून जमीन सपाट तयार केली. यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली. तसेच त्यावर त्यांनी परिसरात असलेल्या धरणातील माती आणून टाकली. यामुळे कधीकाळी खडकाळ वाटणारी जमीन सुपीक झाली.
advertisement
दरम्यान, डोंगर फोडून जमीन तयार केल्यानंतर डॉ. सिताराम जाधव यांनी 5 डिसेंबर 2021 मध्ये हर्बल 9099 या जातीचे 2000 झाडे विकत घेतली. ही दोन हजार झाडे डोंगर भागातील तयार केलेल्या शेतात लागवड केली. झाडे लावताना 12 बाय 12 फुटाचे अंतर ठेवले. आज या झाडांची उंची 10 फुटापर्यंत गेली आहे. झाडे लागवड केल्यानंतर त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेणखत गीर गाईचे गोमूत्र याचा खत म्हणून वापर केला. तीन वर्षे झाली ही झाडे जाधव कुटुंबाला उत्पादन देत आहे.
advertisement
डॉ. सीताराम जाधव नेमकं काय म्हणाले -
आतापर्यंत आम्ही दोन सीजन सफरचंद घरी आणि नातेवाईकांसाठी वापरली. यावर्षी आम्ही व्यावसायिक पद्धतीने विचार करत आहोत. यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणार असल्याचे डॉ. सीताराम जाधव म्हणाले. तरुण शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे म्हणून नेहमी नकारात्मक विचार न करता आहे त्या परिस्थितीमध्ये आपण सकारात्मक पद्धतीने शेती कशी करू शकतो, याबाबत विचार केला पाहिजे. आधुनिक पद्धतीने शेती केली तर त्यामधून चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते, असे डॉ. सीताराम जाधव सांगतात.
मराठी बातम्या/कृषी/
चक्क डोंगर फोडून सफरचंदाची शेती, कन्नडमधील शेतकरी बनला इतरांसाठी प्रेरणा!, नेमकं काय केलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement