छत्रपती संभाजीनगर : देशासाठी काहीतरी करावं ही प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक जण आपापल्या परीने काही नाही काही करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते क्षेत्र कोणत्याही असो. कोणी देश सेवेतून तर कोणी खेळाच्या माध्यमातून देशाचं नाव मोठं करत असतं आणि असेच नाव छत्रपती संभाजीनगर शहरातील सृष्टी साठे हिने केले आहे. सृष्टी साठे हिने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावून आपल्या जिल्ह्याचे तसेच आपल्या देशाचे नाव मोठे केले आहे. सृष्टीने 63 किलो वजनी गटातील हे पदक पटकावलेला आहे.
advertisement
गेल्या 6 वर्षांपासून बॉक्सिंगची तयारी -
सृष्टी ही मूळची छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी आहे. लोकल18 शी बोलताना तिने सांगितले की, तिच्या वडिलांना खेळाची फार आवड आहे आणि माझ्या वडिलांमुळे मी खेळामध्ये आली आहे. मी माझ्या फिटनेससाठी बॉक्सिंग जॉईन केली होती. पण नंतर मला यात आवड निर्माण झाली आणि यामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. मी गेल्या 6 वर्षांपासून बॉक्सिंगची तयारी करत आहे. माझे कोच सनी गहलोत यांनी माझ्याकडून स्पर्धेची संपूर्ण तयारी करून घेतलेली आहे. कसा सराव करावा, काय सराव करावा, हे सर्व मला माझ्या कोचने सांगितले आहे.
आता केमिकल टाकण्याचीही गरज नाही, फक्त हे एक काम करा, घरात अनेक वर्ष खराब होणार नाही गहू
अशाप्रकारे जिंकला सामना -
सृष्टी सांगते की, मी दररोज सकाळ आणि संध्याकाळ तीन तास सराव करते. या सरावामुळे माझी या स्पर्धेमध्ये माझी निवड झालेली आहे. स्पर्धेत निवड झाल्यानंतर मी सर्व ट्रायल्स जिंकले आणि त्यानंतर मी कझाकिस्तान या ठिकाणी स्पर्धेसाठी गेले. या ठिकाणी माझी क्वार्टर फायनल ही चीनच्या तायके सोबत होती. हा सामना मी जिंकले. त्यानंतर माझा सेमी फायनलचा सामना हा कझाकिस्तानच्या बॉक्सरसोबत झाला. ती दोन वेळेस एशियन चॅम्पियन होती.
या तारखेपासून सुरू होतोय चातुर्मास, चुकूनही करू नका ही 5 कामे, महत्त्वाची माहिती
म्हणून तिच्यासोबतचा सामना हा खूप आव्हानात्मक होता. पण त्यामध्येही मी विजय मिळवला. माझे कोच यांनी ज्या मला टेक्निक सांगितल्या होत्या, त्या सर्व मी या ठिकाणी वापरल्या आणि यामुळेच माझा विजय झाला. मला आता भारताचे प्रतिनिधित्त्व ऑलिम्पिकमध्ये करायचे असून त्याठिकाणीही मला माझ्या देशासाठी पदक जिंकायचे आहे. तसेच त्यासाठी माझा सराव आणि माझे प्रयत्न सुरू आहेत, असेही ती म्हणाली.