डॉक्टर म्हणाले की, आपण कित्येक तास सोशल मीडिया का बघतो, यामागे एक शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण रील्स बघतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन (Dopamine) नावाचे एक केमिकल रिलीज होते. डोपामिन रिलीज झाल्यानंतर आनंदाची भावना निर्माण होते. समोरची गोष्ट आपल्याला हवीहवीशी वाटते. याशिवाय, सोशल मीडियावर अतिशय क्रिएटिव्ह कंटेंट असतो. आपण त्याकडे आकर्षित होत जातो.
advertisement
मेंदूवर होतो परिणाम
सतत रील्स बघण्याचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. अनेकजण रील्स बघताना त्यामध्ये एकदम गुंग होतात. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे, याचं भान देखील राहत नाही. म्हणजेच रील्समुळे एकाग्रता कमी होते. अभ्यासामध्ये तसेच इतर दैनंदिन गोष्टींमध्ये देखील लक्ष लागत नाही. सतत मोबाईलमध्ये गुंग असल्याने एकमेकांशी संवाद साधला जात नाही. साध्या-साध्या गोष्टींचा आपल्याला विसर पडू लागतो. काही कारणास्तव एखाद्या दिवशी रील्स बघता आले नाहीत तर चीडचीड होते आणि अस्वस्थ वाटू लागतं.
सोशल मीडियाचा वापर कमी करण्याचे मार्ग
सोशल मीडियामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये असे वाटत असेल तर आपण काही गोष्टी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. सतत फोन बघण्याऐवजी एकमेकांशी संवाद साधा. जास्तीत जास्त वेळ मित्रांच्या किंवा कुटुंबियांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. जेणेकरून आपोआप मोबाईलचा वापर कमी होईल. सोशल मीडियावर काय सुरू आहे, याचे अपडेट घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही टाइमर लावून मोबाईल बघू शकता. ही सर्व काळजी घेतली तर आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.





