छत्रपती संभाजीनगर : कोणतेही ध्येय साध्य करायचं असेल तर त्यासाठी कष्टाची जोडी असावी लागते. तसेच याच कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अनेक तरुणी यश मिळवत आहेत. यातच आता छत्रपती संभाजी नगर शहरातील सीमा नावकर या तरुणीनेही असेच अत्यंत प्रेरणादायी यश मिळवले आहे. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पीएसआय परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये सीमाने पीएसआय पदाची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. तिच्या या यशानंतर लोकल18 च्या टीमने तिच्याशी संवाद साधला. जाणून घेऊयात, तिच्या यशाची, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी.
advertisement
सीमा सुरेश नावकर ही तरुणी मूळची छत्रपती संभाजीनगर शहराची आहे. सीमाचे वडील हे वॉचमनचे काम करतात. तर सीमाची आई ही लोकांच्या घरी ही धुणी भांडे करते. सीमाचे सर्व शिक्षण हे शहरामध्ये पूर्ण झालेला आहे. तिने एमए इंग्रजीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिला सरकारी सेवेत जाण्याची इच्छा होती. तिच्या ट्युशन शिक्षिका प्राजक्ता पाठक यांच्याकडून तिला मिळाली होती. याबाबत तिने सांगितेल की, त्या दिव्यांग असूनही अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने त्यांचे काम करतात आणि त्यांना बघूनच आपणही असंच मेहनतीने काहीतरी करायचं, असं ठरवलं आणि त्यांना बघून जिद्दीने स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी केली.
दरम्यान, सीमाच्या घरची परिस्थिती ही अत्यंत हालाकीची होती. सीमाने दहावीनंतर पुढे शिकण्यासाठी तिच्या आईबरोबर लोकांच्या घरी जाऊन धुणे भांडे केले आणि त्यातून जे पैसे भेटले त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलला. यासाठी तिला अनेक लोकांनी मदत केली, असेही तिने सांगितले.
दरम्यान, 2019 मध्ये तिने पीएसआयची परीक्षा दिली पण त्यामध्ये तिची एका मार्काने पूर्व परीक्षा पास झाली नाही. त्यानंतर परत 2020 मध्ये तिने पीएसआय पदाची परीक्षा दिली. त्यामध्ये देखील तिने पूर्व, मुख्य, मुलाखत आणि मैदानी चाचणी दिली. मात्र, तरीही तिच्या पदरी अपयशच आले. इतके असतानाही ती खचली नाही. तिने पुन्हा जिद्दीने 2021 मध्ये पीएसआयची परीक्षा दिली. या परीक्षेच्या वेळी तिच्या पायाला दुखपड झाली होती तरीसुद्धा तिचे प्रशिक्षक रेड्डी सरांनी तिच्याकडून सर्व तयारी करून घेतली आणि ती ही परीक्षा उत्तीर्ण झाली, असे तिने सांगितले.
Kamada Ekadashi 2024 : कामदा एकादशीच्या उपवासाने मिळते मुक्ती; सर्व दु:ख, कष्टही होतात दूर
आमच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. आमच्या पोट हातावर आहे. मात्र, आज आमच्या पोरीनं जे करून दाखवलं, त्यामुळे आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. आज तिच्या या याच प्रयत्नांमुळे आमची परिस्थिती बदलणार आहे, असे सीमाची आई लता नावकर म्हणाल्या. सीमाचा हा प्रवास तरुणासाठी खरंच प्रेरणादायी आहे.
भाऊ म्हणाले माझे स्वप्न पूर्ण झाले -
माझ्या मुलीच्या या यशाने आमची मान समाजात उंचावली आहे. आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. आमची प्रतिष्ठा वाढली आहे, असे मत तिच्या वडिलांनी यावेळी व्यक्त केले. तसेच तिच्या भावाचेही पोलीस होण्याचे स्वप्न होते. मात्र, परिस्थिती अभावी तो त्याचे स्वप्न करू शकला नाही. मात्र आता मी माझ्या बहिणीने पीएसआय होऊन माझे स्वप्न पूर्ण केले, अशी भावना सीमा हिचा भाऊ संदीप नावकर याने व्यक्त केली.
तरुणाईला तसेच पालकांनाही दिला हा महत्त्वाचा सल्ला -
ग्रामीण भागातील मुला मुलींनी आपले एक ध्येय निश्चित करुन, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यायला हवी. ग्रामीण भागातून आल्यावर शहरात आल्यावर इथंलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुला-मुलींनी आपल्या अभ्यासावर, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायलं हवं. तसेच सोशल मीडियाचा विशेष करुन अत्यंत जपून वापर करायला हवा, असा महत्त्वाचा सल्ला तिने दिला. तसेच आई वडिलांनीसुद्धा आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकारात्मकपणे पाठिंबा द्यायला हवा. सुरुवातीला अपयश जरी आले तरी त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहायला हवे. तसेच मुलगी असेल तर पुन्हा पुन्हा तिला लग्नाचा विषय काढून तिचा आत्मविश्वास न करता तिला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती करायला हवी, असेही सीमा म्हणाली.