TRENDING:

फक्त 10 रुपयांपासून देवीचे वस्त्र, अमरावतीत 'या' ठिकाण दिवाळी शॉपिंगसाठी लोकांची गर्दी

Last Updated:

अमरावतीत दिवाळीच्या शॉपिंगसाठी अंबादेवी मार्केट आणि जोशी मार्केटमध्ये पूजा साहित्याची विविधता उपलब्ध आहे. येथे १० रुपयांपासून देवाच्या वस्त्रांपासून ४०० रुपयांपर्यंत कोरीव काम असलेली आकर्षक वस्त्रे खरेदीसाठी आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी-प्रतिनिधी, अमरावती :
advertisement

अमरावतीमध्ये दिवाळीच्या शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांमध्ये अंबादेवी मार्केट आणि जोशी मार्केट यांचा समावेश आहे. खास करून अंबादेवी मार्केटमध्ये तुम्हाला देवाची पूजा साहित्ये, देवाचे पोशाख आणि विविध वस्त्र अगदी परवडेल अशा किमतीत मिळू शकतात.

अंबादेवी मार्केटमधील पूजा साहित्य आणि देवाची वस्त्रं

अंबादेवी मार्केटमध्ये व्यंकटेश पूजा साहित्य भंडार नावाच्या दुकानात विविध प्रकारची देवाची वस्त्रं उपलब्ध आहेत. दुकानाचे मालक अनिल करपेकर यांच्या मते, १० रुपयांपासून साधी वस्त्रं मिळतात. त्यानंतर २० आणि ३० रुपयांत थोडी मोठी आणि वेगळी डिझाईन असलेली वस्त्रं उपलब्ध आहेत. शिवाय, कृष्ण, देवी आणि इतर देवांसाठीचे विशेष पोशाख येथे विक्रीसाठी आहेत. यामध्ये ५० रुपयांपासून लेस वर्कच्या वस्त्रांचा समावेश आहे, तर टिकली वर्क आणि भारी डिझाईन असलेली पोशाख देखील थोड्या अधिक किमतीत आहेत.

advertisement

विविध प्रकारच्या पोशाखांसाठी किमतीची श्रेणी

कृष्णाच्या पोशाखामध्ये शेला आणि फ्रॉकचा समावेश असून, देवीसाठी वेगळ्या प्रकारचे फ्रॉक, धोती, स्कर्ट असे कपडे उपलब्ध आहेत. २०० ते ४०० रुपयांपर्यंत कोरीव काम असलेले भारी पोशाख ही विक्रीसाठी आहेत. तसेच, रंगांच्या विविधतेत हे सर्व पोशाख मिळतात, ज्यामुळे देवांना सजवण्याचा आनंद अधिक वाढतो.

आसन आणि इतर पूजा साहित्य

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याची कमाल, 3 एकरमध्ये घेतलं तब्बल 45 क्विंटल तुरीचे उत्पादन, Video
सर्व पहा

व्यंकटेश पूजा साहित्य भंडारात पूजेसाठी लागणारे विविध प्रकारचे आसन देखील साईज नुसार उपलब्ध आहेत. यामध्ये वर्क असणाऱ्या आसनांची किंमत १२० रुपये आहे. तसेच इतर पूजेचे साहित्यही परवडेल अशा किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. दुकानाचा पत्ता अंबादेवी मंदिर परिसरातील वाहनतळाच्या बाजूला पहिल्या बोळीत आहे, असे अनिल करपेकर यांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फक्त 10 रुपयांपासून देवीचे वस्त्र, अमरावतीत 'या' ठिकाण दिवाळी शॉपिंगसाठी लोकांची गर्दी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल