सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी बच्चू कडू राजू शेट्टी आणि इतरही शेतकरी नेत्यांनी बुधवारी नागपुरात आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करू अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. आंदोलन न थांबवता चर्चा करणार बच्चू कडू उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार बच्चू कडूंची उद्या मुंबईत सरकार सोबत चर्चा कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल्वे बंद करू आंदोलन न थांबवता चर्चा करू... त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. कारण नागपूर हे भारतातील रेल्वेचे मध्यवर्ती ठिकाण आहे. देशभरातून गाड्या येत असतात, त्यामुळे रेल्वेसेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
advertisement
रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेऊ : बच्चू कडू
आम्ही आंदोलन न थांबवता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी उद्याच मुंबईला जाईल जर त्या चर्चेत फडणवीस यांनी कर्जमाफीची तारीख आम्हाला सांगितली नाही तर आम्ही रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेऊ अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी घेतले आहे.
बच्चू कडूंची उद्या मुंबईत सरकार सोबत चर्चा
बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल दाखल झाले होते. बच्चू कडू यांची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत कर्जमाफीसह इतर मुद्द्यावर बैठक होणार आहे. आंदोलन न थांबवता चर्चा करणार बच्चू कडू उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार बच्चू कडूंची उद्या मुंबईत सरकार सोबत चर्चा कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल्वे बंद करू आंदोलन न थांबवता चर्चा करू, असा इशारा दिला आहे.
