TRENDING:

Pandharpur Wari: असं कुणी वागतं का? चोपदाराने महिला वारकऱ्याला धक्का देऊन पाडलं, VIDEO व्हायरल

Last Updated:

पंढरपूर ठाकूर बाबा रिंगण सोहळ्यात मोठ्या संख्येनं वारकरी जमा झाले होते. रिंगण सोहळा सुरू होता. यावेळी  बाळासाहेब नावाच्या चोपदाराचा एक व्हिडीओ समोर आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आळंदी: विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पाण्या पावसाची तमा न बाळगता पाय चालत निघाले आहे. टाळ मृदुंगाचा तालात वारकरी एक एक टप्पा पार करत पुढे सरकत आहे. पण आळंदीमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आळंदी इथं एका चोपदाराचा मुजोरपणा व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. या चोपदाराने एका महिला वारकऱ्याला अक्षरश: ढकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी इथं ही घटना घडली आहे.  आळंदी देवस्थानमधील एका चोपदाराचा हा व्हिडीओ आहे. गुरुवारी सकाळी पंढरपूर ठाकूर बाबा रिंगण सोहळ्यात मोठ्या संख्येनं वारकरी जमा झाले होते. रिंगण सोहळा सुरू होता. यावेळी  बाळासाहेब नावाच्या चोपदाराचा एक व्हिडीओ समोर आला.

रिंगणाच्या जवळ एक महिला वारकरी डोक्यावर तुळशी घेऊन चालत होती. त्यावेळी या बाळासाहेब चोपदाराने या महिलेला पाठीमागून जोरात ढकललं. जोरात ढकलल्यामुळे ही महिला वारकरी खाली बसलेल्या पोलिसांच्या अंगावर पडली. 'ऐकू येत नाही का, मध्ये कशाला येते' असं म्हणत बाळासाहेब या चोपदाराने या महिला धक्का देऊन खाली पाडलं. या महिलेला खाली बसलेल्या पोलिसांनी कसं बसं पकडलं. ही महिला खाली पडल्यानंतरही बाळासाहेब हा महिला वारकऱ्यावर ओरडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. महिलेला धक्का दिल्याचं पाहून तिथं उपस्थितीत असलेले इतर लोक धावून आले आणि बाळासाहेब चोपदाराला तिथून घेऊन गेले.

advertisement

पण या महिलेला दिलेल्या वाईट वागणुकीमुळे तिथे उपस्थितीत इतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, ही महिला रिंगणाच्या बाजूने चालत येत होती. पाठीमागून धावत येऊन बाळासाहेब चोपदाराने या महिलेला धक्का देऊन खाली पाडलं. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पाठीमागून घोडा येत नव्हता. तरीही बाळासाहेब चोपदाराने हा प्रकार केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी आळंदीमध्ये अशाच एका चोपदाराचा उद्धटपणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pandharpur Wari: असं कुणी वागतं का? चोपदाराने महिला वारकऱ्याला धक्का देऊन पाडलं, VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल