बाबूराम असं अटक केलेल्या २१ वर्षी आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबूरामने १४ नोव्हेंबर २०२५ रोजी या अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. अपहरानंतर तो पीडितेला उत्तर प्रदेशात न ठेवता, तिला थेट मुंबई आणि त्यानंतर पुणे येथे घेऊन गेला होता. सुमारे २५ दिवसांच्या या कालावधीत आरोपीने पीडितेवर वारंवार अमानुष बलात्कार केला.
advertisement
मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. चितबडगाव पोलीस ठाण्याचे स्टेशन अधिकारी दिनेश पाठक यांनी सांगितले की, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि या प्रयत्नानंतर पीडित मुलीला अखेर सुरक्षितपणे सोडवण्यात यश आले.
पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात, आरोपी बाबूरामने तिला महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरात नेत तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचे सांगितले. या जबाबाच्या आधारावर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कलमातर्गंत गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक ओमवीर सिंह यांनी या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आरोपी बाबूरामला शुक्रवारी (१२ डिसेंबर २०२५) धर्मापूरजवळून अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
