बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर करावा या मागणीसाठी रास्ता रोकोचे आंदोलन करण्यात येत होते. अहिल्यानगर-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन तासाहून अधिक काळापासून आंदोलन सुरू असल्याने अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. पोलिसांकडून आंदोलकांना आंदोलन थांबवण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पोलिसांनी मध्यस्थी करूनही आंदोलकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. मागणी मान्य होत नसल्याने काही तरूण आक्रमक झाले होते. त्यांनी एसटी महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली. दगडफेकीत काही एसटी गाड्यांचे नुकसान झाले असून काही प्रवासी देखील जखमी झाले आहेत. प्रवाशांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान, दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांची पांगापाग झाली.