Beed News : सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चायनिज सेंटर चावलवणाऱ्या एका तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. सय्यद इर्शाद असे या हल्ला झालेल्या या तरूणाचे नाव आहे.या हल्ल्यानंतर तत्काळ सय्यद इर्शादला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाल्याची माहिती आहे.तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे हे घटनास्थळी दाखल झाले असून तपास सूरू आहे. या घटनेने बीडमध्ये खळबळ माजली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला झालेल्या सय्यद इर्शाद हा तरूण बीडच्या केज शहरातील बस स्थानकासमोर चायनिज सेंटर चालवतो. नेहमीप्रमाणे आज तो अशाचप्रकारे चायनिज विकत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.या हल्ल्यात सय्यद इर्शाद गंभीररित्या जखमी झाली होता. या हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता.
या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्याचसोबत जखमी सय्यद इर्शाद सुरूवातीला प्रथमोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले होते. त्याच्यावर सध्या उपचार सूरू आहे.
दरम्यान पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे हे घटनास्थळी हजर झालेले आहेत. तसेच सय्यद इर्शादवर हल्ला करणारे अज्ञात लोक कोण होती? याची अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे. तसेच या हल्लेखोरांनी कोणत्याही कारणावरून सय्यद इर्शादवर हल्ला केला आहे?याची अद्याप काहीच माहित नाही.पोलीस या घटनेची कसून तपास करत आहे.त्यामुळे लवकरात लवकर घटनेचा उलगडा होईल आणि आरोपी अटकेत येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.