त्यानंतरही बीड पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विविध आरोप झाले. तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाव्यात, अशी मागणी देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता बीड पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल ते ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अशा 600 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याबाबतची प्रक्रिया पार पाडली असून आता येत्या महिनाभरात हे सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू होतील. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. यातील काही पोलिसांचे स्थानिक गुन्हेगारांशी संबंध होते. त्यामुळे गुन्हेगारांची गुन्हे करण्याची हिंमत वाढली होती.
advertisement
आता बीड पोलीस दलातील तब्बल ६०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. एवढ्या मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचाऱ्यांची खुर्ची बदलली असल्याने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरून पोलीस दलावर होत असलेले आरोप थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
