माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्याच्यासोबत काय झाले हे सर्वांना माहीत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही इथे आलात, असेच कायम आमच्यासोबत उभे राहा. तुमची खंबीर साथ अतिशय महत्त्वाची आहे. आज दु:खाच प्रसंग आहे, तुम्ही सर्व आमचं दु:ख वाटून घेण्यासाठी आला आहात, असे बोलत असताना वैभवीला अश्रू अनावर झाले आहे.
advertisement
माझे वडील कायम गावासाठी झटले : वैभवी देशमुख
वैभवी पुढे म्हणाले, माझ्या वडिलांसाठी गाव हे काय प्रथम स्थानी होते. ते कायम गावासाठी झटत होते.आमच्या गावाने अनेक पुरस्कार जिंकले आहे. माझे वडिल समाजसेवक होते. त्यांनी आजपर्यंत समाजासाठी सर्वकाही केलं. गावामध्ये स्वच्छता अभियान देखील राबवले. तुम्ही असेच आमच्या पाठिशी राहा, कुटुंब म्हणून सोबत राहा,
माझे वडील आम्हाला सोडून गेले, आता तुम्ही आमचा परिवार; देशमुखांचा आक्रोष
तुम्ही सर्वजण माझे कुटुंब आहात मी तुम्हाला माझ्या परिवाराचा हिस्सा मानते. त्यामुळे प्रत्येक मोर्चाला तुम्ही याच संख्येने उपस्थित राहा. माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. जे आरोपी आहेत, त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. माझ्या वडिलांसोबत जो गुन्हा झाला, तो पुन्हा घडू नये , जी वेळ माझ्या कुटुंबावर आली ती कधीच कोणाच्या कुटुंबावर येऊ नये. आता आमचे वडील आम्हाला सोडून गेले आहेत. तुम्ही एक कुटुंब म्हणून साथ द्या, सदैव असेच आमच्या पाठिशी उभे राहा, असे देखील वैभवी या वेळी म्हणाली.
