मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी चौकात दोन गटांतील काही तरुणांमध्ये गाडीला कट लागल्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच वाद वाढत गेला आणि दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या झटापटीत एक तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चौकातील वाहतूक विस्कळीत
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील तरुणांना ताब्यात घेतले मात्र परिसरात बराच वेळ तणाव होता. भांडणामुळे काही वेळासाठी चौकातील वाहतूकही विस्कळीत झाली होती
advertisement
गुन्हा दाखल
या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही गटांतील तरुणांविरोधात परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे नोंदवले आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार दोन्ही गटांवर मारहाणीचा आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतता राखण्याचे आवाहन
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारे राडा झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व तरुणांची चौकशी सुरू केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांच्या भूमिकेमुळे मोठा अनर्थ टळला...
शिवाजी चौकात तरुणांच्या दोन गटात वाद झाला असून, हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिसांना स्थानिकांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेत दोन्ही गटाला पांगवले. . त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली