मारहाणीचा दुसरा व्हिडीओ समोर
शिवराज दिवटेला झालेल्या मारहाणीत अमानुष मारहाण करणारे निर्दयी आरोपी मारहाण केल्यानंतर शिवराज याला सर्वांच्या पाया पडायला लावत आहेत. बीडच्या परळीत समाधान मुंडे आणि टोळीकडून मारहाण करताना पाय पडायला लावतानाचा दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये शिवराज दिवटे मारहाण करणाऱ्यांसमोर दया याचिका करताना दिसतोय.
मारहाणीचं कारण काय?
बीडच्या परळी मध्ये टोकवाडी परिसरातील रत्नेश्वर टेकडी येथे शिवराज दिवटेला मारहाण का झाली? असा प्रश्न विचारला जात होता. अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान इतर मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीये.
20 जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बीएनएस कलम 109, 126(2), 140(3), 118(1),189(2),189(4),190, 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.
