आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
बीडच्या परळीतील जलालपूर येथे जमावाकडून समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरी यांना मारहाण करण्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्या विरोधात समाधान याची याच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान मुंडे हा ऋषिकेश गिरी याला सोडण्यासाठी मोटरसायकल वरून जात असताना जलालपूर येथे चौकामध्ये भागवत साबळे आणि सुरेश साबळे यांच्यासह इतर सात ते आठ जणांनी त्यांना अडवून जीवे मारण्याच्या उद्देशाने काठी लाथा बुक्क्या आणि बेल्टने मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली होती.
advertisement
प्रकरणात ट्विस्ट
आता या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरी हे शिवराज ड्युटी मारहाण प्रकरणातील आरोपी असून आता या दोघांना मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.
दरम्यान, शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी समाधान मुंडेलाही जलालपूरमध्ये मारहाण झाल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला होता. शिवराजचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेत रिंगण करून बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर पायाही पडायला लावले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
