लाठ्या, काठ्या आणि बेल्टने मारहाण
काल परळीतील शिवराज दिवटे नामक तरुणाचं अपहरण करून त्याला अमानुष लाठ्या, काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आली होती. यानंतर पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली असून आरोपींच्या शोधासाठी दोन पथकंही रवाना करण्यात आले आहेत. मारहाण अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान इतर मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून झाल्याचे समोर आले आहे.
advertisement
व्हिडीओ संवेदनशील असल्याने दाखवू शकत नाही, पाहण्यासाठी इथे क्लिक करा-
सात जणांना अटक
या प्रकरणात परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच तातडीने पावले उचलत पोलिसांनी तेलगाव येथून चौघांना उचलले आहे तर इतर तिघांना परळी परिसरातून अटक केले आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
वीस जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बीएनएस कलम 109, 126(2), 140(3), 118(1),189(2),189(4),190, 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.
पाया पडायला लावलं...
दरम्यान, आणखी एक या मारहाणीच्या दरम्यानचा व्हिडिओ समोर आलाय या मारहाणीत अमानुष मारहाण करणारे निर्दयी आरोपी मारहाण केल्यानंतर शिवराज याला सर्वांच्या पाया पडायला लावत आहेत. त्यामुळे आता बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
रोहित पवारांची टीका
माणुसकीला काळीमा फासणारा हा थरारक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओची शहानिशा करून सरकारने याबाबत योग्य ती कारवाई करावी.
