पोलीस म्हणाले पैसे सापडलेच नाहीत
तरुणांना पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची रक्कम आढळलेली नाही. रात्री आम्ही केवळ काही लोकांकडून चाकू ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती पेठ बीड पोलीस ठाण्याचे प्रमुख खेडकर यांनी फोनवरून बोलताना दिली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
व्हिडिओमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा
मात्र, पोलिसांनी वेगळी भूमिका मांडली असली तरी व्हिडिओमध्ये पाचशे रुपयांच्या काही नोटा देखील दिसत आहेत. तर डिक्कीमध्ये चाकू असल्याचं कोणीतरी व्हिडीओमध्ये बोलत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन अशा लोकांना पाठीशी घातलंय का? असा सवाल विचारला जात आहे.
ईव्हीएम मशीन बंद
दरम्यान, बीड शहरातील वार्ड क्रमांक 15 यशवंतराव नाट्यगृह येथील मधील ईव्हीएम मशीन बंद झालं आहे. मशीनमध्ये एरर येत असल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झालाय. दुसरे मशीन बसवण्याची उमेदवाराकडून मागणी केली जात आहे.
अजितदादांचं वक्तव्य चर्चेत
दरम्यान, उमेदवारांनो आजची रात्र डोळ्यात तेल घालून पहा. मतदार आदल्या रात्री खूप विचार करत असतात. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदार ही जागे असतात. घराबाहेर आवाज आला की आतून मतदार म्हणतो, होय - होय मी जागा आहे, कोणाला मतदान करायचं हे विचार करतोय, असं वक्तव्य अजित पवार यांनी राजगुरूनगरच्या सभेत केलं होतं.
