TRENDING:

Beed Loksabha : बीड लोकसभा निवडणुकीचं गणित बदलणार? ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Beed Loksabha : शरद पवार गटाकडून बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड, (सुरेश जाधव, प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (Sharad Pawar) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत भिवंडी (Bhiwandi) आणि बीड (Beed) मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाले. बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांनी उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांचं तिकीट कापल्याची चर्चा आहे. दरम्यान, बजरंग सोनवणे यांचं नाव घोषित झाल्याने ज्योती मेटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
बीड लोकसभा निवडणुकीचं गणित बदलणार?
बीड लोकसभा निवडणुकीचं गणित बदलणार?
advertisement

ज्योती मेटे अपक्ष निवडणूक लढणार?

महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे अपक्ष उमेदवारी लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. दोन दिवसानंतर कार्यकर्त्यांशी भेट घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातील अधिकृत भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती ज्योती मेटे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली. महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांच्या नावाची होती. शरद पवारांसोबत बैठकाही झाल्या होत्या. शेवटी मी लोकसभा निवडणूक लढावी ही लोकांची आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मराठा चेहरा म्हणून ज्योती मेटे अपक्ष परिणाम कारक ठरू शकतील, असं जाणकारांचे मत आहे.

advertisement

वाचा - पंकजा मुंडेंविरोधात उमेदवार ठरला, शरद पवार गटाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवार ठरला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कोजागिरीला बनवा अमृतासारखं मसाले दूध, स्पेशल रेसिपी 5 मिनिटांत तयार, Video
सर्व पहा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. बजरंग सोनवणे यांना पंकजा मुंडे यांच्याविरोधात उतरवण्यात आले आहे. या जागेवरुन शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांना आपल्या गोटात ठेवण्यात यश मिळवलं. त्यानंतर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. आता ज्योती मेटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर या जागेवर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Loksabha : बीड लोकसभा निवडणुकीचं गणित बदलणार? ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल