Lok Sabha Election : पंकजा मुंडेंविरोधात उमेदवार ठरला, शरद पवार गटाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Last Updated:

Lok Sabha Election : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून (Sharad Pawar) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत भिवंडी (Bhiwandi) आणि बीड (Beed) या जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अद्याप सातारा, माढा, रावेर या जागांवरुन सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीत भिवंडी येथील जागेवरुन रस्सीखेच होती. मात्र, ही जागा अखेर पवार गटाने आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी आधीच जाहीर केली आहे. पहिल्या यादीत लोकसभेच्या 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. आज शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाली. या यादीतून 5 लोकसभा जागांवरील उमेदवारींची घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र, प्रत्यक्षात दोनच ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
advertisement
advertisement
पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवार ठरला
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. बजरंग सोनवणे यांना पंकजा मुंडे यांच्याविरोधात उतरवण्यात आले आहे. या जागेवरुन शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांना आपल्या गोटात ठेवण्यात यश मिळवलं. त्यानंतर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता.
advertisement
शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत कोणाला उमेदवारी?
शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके, वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अद्याप सातारा, माढा आणि रावेर मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Lok Sabha Election : पंकजा मुंडेंविरोधात उमेदवार ठरला, शरद पवार गटाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement