Udayanraje Bhosale : उदयनराजेंचं शरद पवारांना जशास तसं उत्तर, कॉलर उडवून म्हणाले...
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Udayanraje Bhosale : सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याआधीच खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.
सातारा, (सचिन जाधव, प्रतिनिधी) : महायुतीमध्ये अद्यापही सातारा लोकसभा कुणाकडे याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साताऱ्याच्या जागेवरुन रस्सीखेच सुरू होती. अशातच तिकीट मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी थेट दिल्लीत ठाण मांडलं. त्यामुळे उमेदवारी त्यांनाच मिळणार असल्याचे समजते आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जरी जाहीर झाली नसली तरी त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. उदयनराजे सातारा जिल्ह्यात फिरुन महत्वाच्या नेत्यांच्या गाठिभेटी घेत आहेत.
उदयनराजे भोसले आज भिलार येथे उदयनराजे हे लोकांशी संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांबरोबर बोलत असताना त्यांनी विविध प्रश्नांना त्यांच्या वेगळ्या शैलीत उत्तर दिली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले. पत्रकार माझ्या दौऱ्याबद्दल जे प्रश्न विचारणार आहात. त्यामुळं मला गुंगी आली आहे, अशा प्रकारची मिश्किल टिपणी सुरुवातीलाच खासदार उदयनराजे यांनी केली. यावेळी लोकसभा निवडणुकीबाबत विचारले असता यामध्ये लपवून ठेवण्यासारखं काय आहे. मी आधीच सांगितलेलं आहे. मी उभा राहणार म्हणजे राहणार, अशी स्पष्ट भूमिका उदयनराजे यांनी मांडली. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांना टोला लगावला.
advertisement
अद्याप भाजपने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले मी आत्ताच किंगबेरीच्या गुहेत गेलो होतो. तिथं बरेच पक्षी बघितले ते काय ठरवतात ते बघू की ते पक्षी माझ्याबरोबर आहेत. बाकीच्यांचं मला आता माहित नाही, अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली.
पवारांना टोला
उदयनराजे भोसलेंनी पुन्हा कॉलर उडवत ही माझी स्टाईल आहे. माझ्या कॉलर उडवण्यावर टिका झाली. कॉलर काढुन घ्या, अन्यथा काहीही काढुन घ्या. मात्र, माझ्यावर असलेलं लोकांच प्रेम कोणी काढुन घेवु शकत नाही, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी पावसावर देखील भाष्य केलं. पावसामुळं सगळं झालं असं काही लोक म्हणत असतील. निवडणुकीत पाऊस पडला पाहिजे. मात्र, पाऊस पडणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना पाणी हवं आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. विरोधकांच माझ्यावर प्रेम आहे. यावेळी बच्चा समझके छोड दिया असं ते म्हणत असले तरी आता मी बच्चा राहिलो नाहीस मला माझं काम केलच पाहिजे, असंही उदयनराजे म्हणाले.
advertisement
पवारांनी उडवली होती कॉलर
खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाइलवर समर्थक अगदी फिदा आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात कॉलर उडवली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट शरद पवारांनी कॉलर उडवून एकप्रकारे उदयनराजेंना आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.
advertisement
वैचारीक मतभेद असु शकतात. मात्र, त्यांचे विचार त्यांच्यापाशी माझे विचार माझ्यापाशी. चर्चेतुन मार्ग निघु शकतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं मोठा आहे. श्रीनिवास पाटील असतील किंवा शशिकांत शिंदे ज्यांना कोणाला उभं राहायचय त्यांनी राहावं, असंही उदयनराजे म्हणाले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
April 04, 2024 5:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Udayanraje Bhosale : उदयनराजेंचं शरद पवारांना जशास तसं उत्तर, कॉलर उडवून म्हणाले...