Lok Sabha Elections : अखेर भावासाठी धावून आले प्रकाश आंबेडकर; अमरावतीबाबत घेतला मोठा निर्णय
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Lok Sabha Elections : अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने मोठा निर्णय घेतला आहे.
अमरावती, (संजय शेंडे, प्रतिनिधी) : अमरावती लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस चुरस वाढत चालली आहे. आधी दुरंगी वाटणारी लढत बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने तिरंगी केली. आता यात आणखी एक भिडू उतरल्याने येथे चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वंचितने अमरावतीतून उमेदवार न देता रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकरांना मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. वंचितने राज्यात आपले 24 उमेदवार जाहीर केले आहेत. तर नागपूर, कोल्हापूर, बारामती या जागांवरील महाविकास आघाडीतील उमेदवारांना देखील वंचितने पाठिंबाही जाहीर केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना आनंदराज आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) मला पाठिंबा देणार, असा विश्वास व्यक्त केलेला. पण असं काही झालं नाही. वंचित बहुजन आघाडीनं आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांनी आपला लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अशातच अमरावतीत भाजपला यश मिळू नये यासाठी त्यांनी वंचितच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.
advertisement
आनंदराज आंबेडकरांनी घेतली होती माघार
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना आनंदराज आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) मला पाठिंबा देणार, असा विश्वास व्यक्त केलेला. पण असं काही झालं नाही. वंचित बहुजन आघाडीनं आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांनी आपला लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचा सांगितले. त्यानंतर काहीच तासात वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
advertisement
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्र पाठवून उमेदवारी मागे घेऊ नये. व पाठिंबा दिल्याचे केले जाहीर केलं आहे. वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देत नसल्याने आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी काल जाहीर केले होते. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू आहेत. अखेरीस भाऊ भावाच्या मदतीला धावून आल्याचे बोलले जात आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
April 04, 2024 4:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Lok Sabha Elections : अखेर भावासाठी धावून आले प्रकाश आंबेडकर; अमरावतीबाबत घेतला मोठा निर्णय