राज ठाकरे म्हणाले की, तो कालच्या प्रकारातला शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ओरडत गेला की एक मराठा, लाख मराठा. म्हणजे त्यांना दाखवायचंय की हे जरांगे पाटलांचे लोक आहेत. पण त्यांच्या आडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे. हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. काल जे बीडमध्ये सुपारी फेक प्रकरण झालं त्यात तर शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच होता.
advertisement
बीडची घटना झाली त्यात तीन पत्रकार सापडले. ही कोणती पत्रकारिता आहे. मी दौरा पूर्ण करून मुंबईला गेल्यानंतर बघेन, काय विघ्न आणतात. काल त्यांनी पाठवलेली माणसं नव्हती. ती कोण माणसं होती ते तुम्हालाही माहितीय. जरांगेंसोबतचे आंदोलनकर्ते नव्हते. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सोबतची माणसं होती असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांनी म्हटलं की, मराठवाड्याबद्दल मी जे ऐकून होतो ते मला दिसलं. मराठवाड्यातले काही पत्रकारही त्यात सहभागी आहेत. मला त्यांची नावंही माहिती आहेत. ती योग्य ठिकाणी जातीलही. कुणाला पेव्हर ब्लॉकचे काँट्रॅक्ट्स मिळाले, कुणाला एमआयडीसीत जागा मिळाल्या, कुणाला किती पैसे मिळाले, त्यातून कशा गाड्या घेतल्या गेल्या अशा सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या आहेत.
