Raj Thackeray : आरक्षणाची गरज नाही वक्तव्यावर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण; जरांगेंवरून शरद पवारांवर निशाणा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
सोलापूरला आरक्षणाबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण दिलं. तसंच मनोज जरांगे पाटील यांनी समाजावर राग काढू नये अशा शब्दा सुनावलं आहे.
सिद्धार्थ गोदाम, छत्रपती संभाजीनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी सोलापूरपासून दौरा सुरू केला आहे. आज ते छत्रपती संभाजीनगरमध्ये असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्य प्रकरणी स्पष्टीकरण दिलं. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली. दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे माझा पहिला दौरा सुरू आहे. २० पासून विदर्भ दौरा करेन. माझा दौरा हा आटोपता नाही तर पूर्ण झाला. काही ठिकाणी गॅप होता, पण तो घेतला नाही असंही राज ठाकरे म्हणाले.
सोलापूरला आरक्षणाबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, सोलापूरला बोललो ते सगळ्यांनी पाहिलं. जाणीवपूर्वक बातम्या केल्या. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं ही भूमिका मनसेच्या स्थापनेपासूनच आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हटलं कारण राज्यात संधी उपलब्ध आहेत. पण त्या संधी बाहेरच्या मुलांना मिळतात, स्थानिकांना मिळत नाहीत. या संधीचा योग्य वापर झाला तर आरक्षणाची गरजच नाही. आंबेडकर, फुले, शाहू आर्थिक गरजूंना आरक्षण द्यावं या मताचे होते.
advertisement
मनोज जरांगेंबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्या दौऱ्यात मनोज जरांगे यांचा विषयच नव्हता. त्यांच्या मागे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मराठवाड्यातील काही पत्रकार यात सामील आहेत. काहींना जागा, प्लॉट आणि गाड्या कशा मिळाल्या हे मला माहिती असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी आरोप केला.
advertisement
संविधान बदलणार हे भाजपचे लोक बोलले आणि त्याचा परिणाम झालाय. जरांगेंमुळे काहीही झालं नाहीय. जरांगे पाटील यांच्या आडून विरोधी पक्ष राजकारण करतायत. शरद पवार मणिपूर होईल म्हणतात म्हणजे यांच्या डोक्यात काय चाललंय ते दिसतंय. दंगल घडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला.
advertisement
माझ्या दौऱ्यात अनेक अडचणी आल्या. माझे मोहोळ उठले तर यांना सभा घेणं मुश्किल होईल. माझ्या नादाला लागू नये. याच्या राजकारणाचा बेस यावरच आहे. यांचा राज फडणवीस यांच्यावर आहे तर यांनी समाजावर राग काढू नये अशा शब्दात राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 10, 2024 2:05 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Raj Thackeray : आरक्षणाची गरज नाही वक्तव्यावर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण; जरांगेंवरून शरद पवारांवर निशाणा


