ठाकरेंनी घेतली आफ्रिकेत घोटाळा करणाऱ्यांची भेट; म्हस्केंचा आरोप; कोण आहेत गुप्ता बंधू?

Last Updated:

उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंची भेट घेतल्याचा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय.

News18
News18
प्रशांत लीला रामदास, दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दिल्ली दौरा केला. या दिल्ली दौऱ्यावरून शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी जोरदार टीका केलीय. उद्धव ठाकरेंचा दिल्लीतला सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला असं नरेश म्हस्के म्हणाले. मलाच मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते. पण काँग्रेसने त्यांना हूसकावून लावले आहे. दिल्लीत त्यांना कुणी भाव दिला नाही असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना नरेश म्हस्के म्हणाले की, तीन दिवसांत ठाकरे कुटुंब राऊतांच्या घरातच तळ ठोकून होते. तिथे दक्षिण अफ्रिकेत अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्य गुप्ता बंधूंपैकी एक जण आला होती अशी पक्की माहिती आमच्याकडे आली आहे. ठाकरे आणि गुप्ता यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. राऊतांनी घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कदाचीत बंद ठेवले असतील. पण, या भागातल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत.
advertisement
राऊतांच्या बंगल्यात ७ तारखेला संध्याकाळी काळ्या काचेच्या गाडीतून कोण आलं होतं याची चौकशी व्हायला पाहिजे. वादग्रस्त गुप्ता बंधूमना उध्दव ठाकरे नक्की कशासाठी भेटले याचीही चौकशी व्हायला हवी. उद्धव ठाकरे यांना राजकारणातलं फार काही कळत नाही. असं मी नाही शरद पवार साहेबांनीच लिहून ठेवलंय असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
advertisement
राष्ट्रवादीच्या एका नेत्यालाही मुख्यमंत्री व्हायचंय. त्यात उद्धव ठाकरे अडसर ठरू नये म्हणून त्यांना अडकवण्यासाठी संजय राऊतांनीच गुप्ता बंधूंची भेट घडवून आणलेली नाही ना असा संशय घ्यायलाही जागा आहे. सत्ता गेल्यामुळे ठाकरेंकडे कंटेनर येणं बंद झालं आहे. आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेल ना?  गुप्ता बंधू आणि ठाकरे यांची भेट झाली हे नक्की आहे. त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
advertisement
कोण आहेत गुप्ता बंधू?
आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जावधींची लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंवर गुन्हा दाखल आहे. अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी रँड्सचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. अजय, अतुल आणि राजेश गुप्ता हे मूळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे. अतुल गुप्ता यांनी पहिल्यांदा चपलांचा व्यवसाय केला आणि नंतर सहारा कॉम्प्युटर सुरू केले. त्यानंतर त्यांनी खाणकाम, हवाई प्रवास, ऊर्जा आणि माध्यम यांसारख्या उद्योगांमध्ये स्वतःचा विस्तार केला.
advertisement
कंपनीच्या एका कामानिमित्त १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले. तिथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राजकारणी जेकब झुमा यांची भेट घेतली. झुमा २००९ ते २०१८ पर्यंत देशाचे अध्यक्ष होते. गुप्ता बंधूंवर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी झुमाशी असलेल्या त्यांच्या संबंधांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे,
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाकरेंनी घेतली आफ्रिकेत घोटाळा करणाऱ्यांची भेट; म्हस्केंचा आरोप; कोण आहेत गुप्ता बंधू?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement