TRENDING:

Jyoti Mete : ज्योती मेटेंनी पहिल्यांदाच जाहीर केली भूमिका, बीड लोकसभा लढवण्याबाबत म्हणाल्या..

Last Updated:

Jyoti Mete : दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन डॉ. ज्योती मेटे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड, (सुरेश जाधव, प्रतिनिधी) : दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन, मेटेंच्या पत्नी तथा शिवसंग्रामच्या सर्वसर्वा डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी आपली पुढची राजकीय भूमिका जाहीर केली आहे. तर लोकसभा (Lok Sabha Election 2024) उमेदवारी विषयी 29 मार्चला निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. काही दिवसांपूर्वीच ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही भेट घेतली.
ज्योती मेटेंनी पहिल्यांदाच जाहीर केली भूमिका
ज्योती मेटेंनी पहिल्यांदाच जाहीर केली भूमिका
advertisement

ज्योती मेटेंनी जाहीर केली भूमिका

ज्योती मेटे म्हणाल्या, की गेल्या अनेक दिवसांची पोकळी भरून काढण्यासाठी आता मी ठरवलं आहे. त्यामुळे मी आता यापुढे पूर्णपणे राजकीय काम करणार असल्याची भूमिका, शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉ. ज्योती मेटे यांनी जाहीर केली आहे. त्या बीडच्या शिवसंग्राम भवन येथे मीडियाशी बोलत होत्या. दरम्यान यावेळी ज्योती मेटे शिवसंग्राम भवन येथे आल्या असता कार्यकर्त्यांनी बीड का खासदार कैसा हो ज्योती मेटे जैसा हो, असं म्हणत घोषणाबाजी देखील केली आहे.

advertisement

बीडात पवार पुन्हा 'मराठा कार्ड' खेळणार?

बीड लोकसभा हा तसा भाजपच्या मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. पण तिथं ओबीसी विरूद्ध मराठा अशी लढत झाली तर भाजपची जागा धोक्यात जाऊ शकते, हे पवारांना चांगलंच ठाऊक आहे. कदाचित म्हणूनच पवारांनी यावेळी तिथून दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी चालवली आहे. तसेच त्यांना सपोर्ट म्हणून बंजरंग सोनवणे यांनाही पक्षात सामील करून घेतलंय. सोनवणे हे माजलगाव विधानसभा तर ज्योती मेटे या मविआतर्फे बीड लोकसभेसाठी मैदानात उतरू शकतात.

advertisement

वाचा - बैठकांचं गुऱ्हाळ सुरू असताना अजितदादांनी पहिला उमेदवार केला जाहीर

बीड लोकसभेतील जातनिहाय मतदारांची संख्या

एकूण मतदार - 21 लाख

मराठा मतदार - साडेसात लाख

ओबीसी मतदार - सहा लाख..

दलित मतदार - 2 लाख

मुस्लिम मतदार- 3.5 लाख

इतर - 2 लाख

बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा मोठा प्रभाव असल्याने ज्योती मेटे यांना त्याचा मोठा राजकीय लाभ मिळू शकतो. कारण दिवंगत विनायक मेटे यांचं मराठा आरक्षण लढ्यात मोठं योगदान राहिलं आहे. म्हणूनच जर समजा ज्योती मेटे या मविआतर्फे उभा राहिल्या तर पंकजा मुंडे यांना जोरदार फाईट देऊ शकतात, असं स्थानिक पत्रकारांना वाटतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

बीडमध्ये मुंडे परिवार हा आजवर एकगठ्ठा ओबीसी वोट बँकेच्या जीवावर राजकीय प्राबल्य राखत आलाय. पण तिथं समोरुन मराठा उमेदवार दिला गेला तर लागलीच मतांचं ध्रुवीकरण होऊन फाईट रंगतदार बनते. पण या दुरंगी लढतीत मुस्लीम आणि दलित मतदार जिकडे झुकतो त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो. पण यंदा बीडात जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा फॅक्टर पुन्हा प्रभावशाली बनू पाहतोय. अशातच विनायक मेटे यांच्या अकाली अपघाताने निर्माण झालेली सहानुभूती ज्योती मेटे यांना मोठी फलदायी ठरू शकते. म्हणूनच यावेळीही बीडची लढत चर्चेत राहणार हे नक्की.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Jyoti Mete : ज्योती मेटेंनी पहिल्यांदाच जाहीर केली भूमिका, बीड लोकसभा लढवण्याबाबत म्हणाल्या..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल