Lok Sabha Election : बैठकांचं गुऱ्हाळ सुरू असताना अजितदादांनी पहिला उमेदवार केला जाहीर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Lok Sabha Election : रायगड लोकसभा मतदार संघाबाबत महायुतीत तिढा कायम असल्याचे चित्र आहे. असे असताना अजित पवार यांनी आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
jit pawarरायगड, (प्रमोद पाटील, प्रतिनिधी) : राज्यात आघाडी आणि युतीत लोकसभेच्या प्रत्येक जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत भाजपने आघाडी घेत आतापर्यंत 23 उमेदवार जाहीर केले आहेत. अशात आता अजित पवार गटानेही आपला पहिला पत्ता खोलला आहे. शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटात रायगड मतदारसंघावरुन मतभेद सुरू आहे. अशात अजित पवार यांनी आपला पहिला उमेदवार रायगड जिल्ह्यातूनच जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या या भूमिकेवर आता शिंदे गट आणि भाजप काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
अजित पवार गटाकडून पहिला उमेदवार जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर. पहिले उमेदवार म्हणून रायगड लोकसभा मतदार संघासाठी सुनील तटकरे यांच्या नावाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घोषणा करण्यात आली. अजित पवार म्हणाले, महायुतीत 48 जागा मध्ये कोणती कोण लढवणार याबाबत 99 टक्के ठरलं आहे. 28 तारखेला मुबईत पत्रकार परिषद घेऊ. आता सगळे उमेदवार ठरले आहेत. राहिलेले सगळी नाव 28 तारखेला जाहीर होईल. रायगड सुनील तटकरे महायुती उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील.
advertisement
महायुती 48 जागा लढवणार आहेत. अनेक जणांनी फॉर्म भरले आहेत, बाकी जागा 28 तारखेला जाहीर करू. 20 वर्षांनी पाटील यांना शिरूरमध्ये पक्ष प्रवेश देतोय. दुसरी जागा तिकडे जाहीर करू. मीडियात जागेबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जागा वाटपाबाबत व्यवस्थित मार्ग काढला गेला आहे. मित्र पक्षाने जागा वाटपाबाबत सहकार्य केलं. आज आमदार मंत्री यांच्यावर जबाबदारी दिली आहे. आमदार, विधानसभा आणि मंत्री लोकसभा निवडणुकीत काम करतील. स्टार प्रचारक म्हणून लवकरच जाहीर करू. आमचे प्रमुख धनंजय मुंडे असतील.
advertisement
समाधानकारक जागा मिळाल्या : अजित पवार
view commentsअनेक कामं सुरू आहे. 28 तारखेला उमेदवार कोण कुठे कसा असेल तेव्हा सगळ चित्र स्पष्ट होईल. भरपूर जागा मागितल्या, पण कार्यकर्त्यांना समाधान होईल इतक्या जागा मिळाल्या आहेत. जागा सगळ्या कोणाला दिल्या ते लवकरच समोर येईल. शिवतारेंबाबत काही कॉमेंट करायची नाही. तर शिरूरबाबत उमेदवार मिळायला उशीर झालाय अस तुम्हाला वाटत असेल. पण गेलेवेळी मीच अमोल कोल्हे यांना शोधलं. निवडणुका आहेत जिंकण्यासाठी लढायच्या असतात. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं आणि उमेदवारी दिली असल्याचे अजित पवार म्हणाले.
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
March 26, 2024 3:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Lok Sabha Election : बैठकांचं गुऱ्हाळ सुरू असताना अजितदादांनी पहिला उमेदवार केला जाहीर


