TRENDING:

बीडच्या तरुणाची कमाल!, नोकरी नव्हे तर वडापाव विकून कमावतोय लाखो रुपये, VIDEO

Last Updated:

वडापाव सर्वांनाच खायला आवडतो. चवीला कुरकुरीत आणि खमंग अशा वडापावला ग्राहकांचा देखील अगदी चांगला प्रतिसाद मिळतो. आज अशाच एका वडापाव विक्रेत्याची कहाणी आपण जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत पवार, प्रतिनिधी
advertisement

बीड - नोकरी नव्हे तर व्यवसाय करुनही अगदी वडापाव विकूनही लाखो रुपयांची कमाई करता येते, हे एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. दिवसेंदिवस वडापावला अधिक मागणी मिळत आहे. त्यामुळेच हॉटेल व्यावसायिकांमध्ये वडापाव विक्रीचे प्रमाण वाढले आहे.

वडापाव सर्वांनाच खायला आवडतो. चवीला कुरकुरीत आणि खमंग अशा वडापावला ग्राहकांचा देखील अगदी चांगला प्रतिसाद मिळतो. आज अशाच एका वडापाव विक्रेत्याची कहाणी आपण जाणून घेऊयात.

advertisement

Pune News : एक वही एक पेन उपक्रमाची सर्वत्र चर्चा, पुण्यातील हा उपक्रम नेमका आहे तरी काय?

शुभम शिंदे असे या व्यक्तीचे नाव आहे. बीड येथील शुभम शिंदे यांनी छोट्याशा गाड्यापासून या व्यवसायाला सुरुवात केली होती. आज वडापाव विक्रीच्या माध्यमातून ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ग्राहकांचा अगदी चांगला प्रतिसाद मिळत असून वडापाव विक्रीच्या माध्यमातून शुभम शिंदे यांना अगदी चांगला नफा मिळतो आहे. वडापाव विक्रीचा जोरावर त्यांनी नाश्त्याचेही हॉटेल चालू केले आहे. यामध्ये पुरी भाजी, पावभाजी तसेच इतर काही पदार्थांचा समावेश आहे.

advertisement

सोलापूरकरांना मिळाले तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलशाचे प्रत्यक्ष दर्शन, VIDEO

दूरवरून लोक इथे वडापावची चव घेण्यासाठी आवर्जून येतात. खऱ्या अर्थाने वडापाव विक्रीचा व्यवसाय हा त्यांच्या यशाचा मार्ग ठरला आहे. आधी छोटीशी केलेली सुरुवात ही आज एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचली आहे. शुभम शिंदे ही महिन्याला एक ते दीड लाख एवढी कमाई महिन्याला करतात. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीडच्या तरुणाची कमाल!, नोकरी नव्हे तर वडापाव विकून कमावतोय लाखो रुपये, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल