आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद चिघळत असून, याप्रकरणी दोन्ही बाजूंच्या वक्तव्यांमुळे वातावरण तापले आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या एका मेळाव्यात जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर जोरदार हल्लाबोल करत, अध्यक्ष घनशाम जोशी यांना “बेडकाची उपमा” दिली आणि “ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात” अशी टिप्पणी केली. या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे.
advertisement
वाद चिघळल्याने मंगळवारी जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. “मी कुठेही समाजाबद्दल अवाक्षर बोललेलो नाही. माझ्या भाषणाचा रोख गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यक संघावर होता, संपूर्ण समाजावर नव्हता. तरीही त्यांनी समाजाच्या वतीने निषेधाचे पत्र दिले. मग मी माफी कसली मागायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भास्कर जाधव यांनी म्ह़टले की, राजकीय वादमध्ये ब्राम्हण समाजाने पत्र द्यायची गरजच नव्हती. निलेश राणे यांनी माझ्या आई बहिणी विषयी वापरलेली भाषा काय होती?माझ्या आईवरून खालच्या पातळीची भाषा वापरता. विनय नातू तेव्हा टाळ्या वाजवत होता. आई बहिणीवरून शिव्या देत असताना ब्राम्हण समाजाला टाळ्या वाजवण्याचा अधिकार आहे काय? माझ्या आई बहिणीवरून शिव्या देत असताना विनय नातू जे टाळ्या वाजवत होते तेव्हा ब्राम्हण समाजाने निषेध व्यक्त का केला नाही असा उलट सवालही जाधव यांनी केला. माझा विरोध ब्राम्हण समाजाला नसून आपले वक्तव्य हे ब्राम्हण सहायक संघाला उद्देशून असल्याचे भास्कर जाधवांनी स्पष्ट केले. जाधव यांनी भाजपवरही निशाणा साधत “भारतीय जनता पार्टी ब्राह्मण समाजाला पुढे करते आणि मग काही कारण नसताना माझ्याविरोधात पत्र लिहिले जाते. द्वेष पसरवायचा तुम्ही आणि खापर दुसऱ्यावर फोडायचे, हे दिवस आता संपले आहेत” असा पलटवार केला.
