TRENDING:

BMC Election: मुंबईत भाजपने ३२ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारलं, बड्या नावांचाही समावेश पाहा यादी

Last Updated:

BJP BMC Candidates: मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी भाजपने चंगच बांधला आहे. मात्र, २०१७ मध्ये निवडून आलेल्या ३२ माजी नगरसेवकांना पुन्हा संधी नाकारली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईत भाजपने ३२ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारलं, बड्या नावांचाही समावेश, पाहा यादी
मुंबईत भाजपने ३२ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारलं, बड्या नावांचाही समावेश, पाहा यादी
advertisement

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी भाजपने चंगच बांधला आहे. भाजप मुंबई महापालिकेत १३७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजपने यंदा आपल्या उमेदवारांच्या यादीत तरुण आणि नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. मात्र, २०१७ मध्ये निवडून आलेल्या ३२ माजी नगरसेवकांना पुन्हा संधी नाकारली आहे.

advertisement

भाजपने महापालिका निवडणुकीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून नवीन डावपेच टाकत विरोधकांना खिंडीत गाठण्याची रणनीती आखली आहे. मागील २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने ८२ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, त्यातील ३२ जणांच्या नावावर काट मारली आहे. या नगरसेवकांच्या जागी नवीन उमेदवार देण्यामागे काही कारणं असल्याचे समोर आले आहे.

कोणत्या कारणाने उमेदवारी नाकारली?

advertisement

या माजी नगरसेवकांना पुन्हा संधी नाकारण्यामागे काही कारणे आहेत. यात, वॉर्ड आरक्षण महत्त्वाचे आहे. तर, काहींना वयाच्या मुद्यावर पुन्हा संधी नाकारण्यात आली. तर, दोन दिवगंत नगरसेवकांच्या जागी दोन नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तर निधन झालेल्या एका नगरसेवकाच्या जागी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला संधी देण्यात आली आहे.

>> भाजपने कोणाला नाकारली संधी? पाहा यादी

advertisement

वॉर्ड क्र. माजी नगरसेवक विद्यमान उमेदवार
2 जगदीश ओझा तेजस्वी घोसाळकर
8 हरीश रावजी योगिता पाटील
13 विद्यार्थी सिंग राणी द्विवेदी
14 आशावरी पाटील ॲड. सीमा शिंदे
15 प्रवीण शाह जिग्ना शाह
16 अंजली खेडकर श्वेता कोरगावकर
17 बिना दोषी डॉ. शिल्पा सांगोरे
21 प्रतिभा गिरकर लीना देहेरकर
22 प्रियांका मोरे हिमांशू पारेख
24 सुनीता यादव स्वाती जयस्वाल
27 सुरेखा पाटील नीलम गुरव
29 सागर ठाकूर नितीन चव्हाण
30 सेजल देसाई योगेश वर्मा
36 दक्षा पटेल सिद्धार्थ शर्मा
45 डॉ. राम बारोट संजय कांबळे
50 दीपक सिंग विक्रम राजपूत
67 रेणू भसीन सुधा सिंग
85 ज्योती अळवणी मिलिंद शिंदे
99 संजय अगळदरे जितेंद्र राऊत
103 मनोज कोटक हेतल मोर्वेकर
105 रजनी केणी अनिता वैती
107 स्मित कांबळे नील सोमय्या
122 वैशाली पाटील चंदन शर्मा
132 पराग शाह ऋतू तावडे
139 बिंदू त्रिवेदी धर्मेश गिरी
174 कृष्णवेणी रेड्डी साक्षी कनोजिया
177 नेहल शाह कल्पेश कोठारी
217 मीनल पटेल ॲड. गौरांग झवेरी
218 अनुराधा पोतदार स्नेहल तेंडुलकर
219 ज्योत्स्ना मेहता साक्षी सानप
220 अतुल शाह दिपाली कुलथे

advertisement

मतदानाआधीच दोन जागांवर फटका..

भाजपला मतदानापूर्वीच दोन जागांवर फटका बसला आहे. वॉर्ड क्रमांक २११ आणि २१२ मध्ये महायुतीचा उमेदवार नाही. वॉर्ड क्रमांक २११ मध्ये भाजप उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. तर, २१२ मध्ये भाजपच्या महिला उमेदवाराला अर्ज दाखल करण्यास १५ मिनिटांचा उशीर झाला. त्यामुळे एबी फॉर्म असूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या वॉर्डमध्ये अपक्ष अथवा अन्य उमेदवाराला भाजपला पाठिंबा द्यावा लागणार आहे.

इतर संबंधित बातमी: 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
30 गुंठ्यात केली शेती, 4 महिन्यात मिळालं दिड लाख उत्पन्न, असं काय केलं?
सर्व पहा

BJP Candidate List BMC Election: भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: मुंबईत भाजपने ३२ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारलं, बड्या नावांचाही समावेश पाहा यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल