राष्ट्रवादीचा मोर्चा
पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) च्या हजारो कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. इस्लामपूर मतदारसंघातील विरोधकांसह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अशा वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पडळकरांच्या टीकेमुळे भाजपची कोंडी?
इस्लामपूर मतदारसंघातून भाजपमध्ये असलेले माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे हे एकेकाळी जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक होते. राज्यात धनगर समाजाचे नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते. पडळकरांच्या टीकेमुळे त्यांच्या समर्थकांतही नाराजी असल्याचे दिसत आहे. काही लोकांच्या मते, पडळकरांच्या या वक्तव्यामुळे धनगर समाजाचे नेते म्हणून ॲड. चिमण डांगे यांचे भाजपमधील वजन वाढण्याची शक्यता आहे. या वादामुळे इस्लामपूर, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील वातावरण कमालीचे तापले आहे.
advertisement
सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया
या वादावर आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सर्वच नेत्यांनी एकमेकांचा आदर करावा. राजकारण आणि समाजकारण करणारे आदर्श व्यक्तिमत्त्व असतात. सध्याच्या राजकारणात 'अरे' ला 'कारे' म्हणणारे नेते तयार झाले आहेत. याची कारणे राजकारण्यांनी शोधावीत आणि वक्तव्यांवर संयम ठेवावा," असे आवाहन त्यांनी केले आहे.
हे ही वाचा : मनसेच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं आणखी एक पाऊल पुढे, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश
हे ही वाचा : गोपीचंद पडळकर मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नाही? मग्रुरी कायम! त्यांना पाठिंबा कुणाचा?