गोपीचंद पडळकर मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नाही? मग्रुरी कायम! त्यांना पाठिंबा कुणाचा?

Last Updated:

मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावल्यानंतर तरी गोपीचंद पडळकर सुधारतील असं वाटलं होतं. मात्र पडळकरांना सुधारण्याचा छंद नसल्याचं त्यांनीच अश्लाघ्य वक्तव्यातून दाखवून दिलं.

देवेंद्र फडणवीस-गोपीचंद पडळकर
देवेंद्र फडणवीस-गोपीचंद पडळकर
संतोष गोरे, मुंबई: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर भानावर येणार आहेत की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय. गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या लॉबीत केलेल्या हाणामारीमुळे महाराष्ट्राला बट्टा लागला होता. त्यामुळे आमदार माजलेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मात्र या नंतरही जयंत पाटलांवर गोपीचंद पडळकरांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली. त्यामुळे पडळकरांना आवरणार तरी कोण? असा प्रश्न निर्माण झालाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जुलैला विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांना खडेबोल सुनावले होते. आमदारांमुळे जनता सर्व नेत्यांना शिव्या देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. कारण 17 जुलै रोजी विधानभवनाच्या लॉबीत आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला होता. यूपी-बिहारमधील नेत्यांनाही लाज वाटावी असं ते दृश्य होतं. मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावल्यानंतर तरी गोपीचंद पडळकर सुधारतील असं वाटलं होतं. मात्र पडळकरांना सुधारण्याचा छंद नसल्याचं त्यांनीच अश्लाघ्य वक्तव्यातून दाखवून दिलं.
advertisement
गोपीचंद पडळकरांच्या अशोभणीय वक्तव्याचे राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद उमटले. सांगली जिल्ह्यातील जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या विरोधात आंदोलन केलं. तर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पडळकरांचा समाचार घेतला. शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. ही भाषा आणि वृत्ती गलिच्छ आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नाही, अशा शब्दात शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र सुप्रिया सुळेंनी जोरदार तोफ डागली. 'सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावू नका', असे त्यांनी म्हटले.
advertisement
राज्य सरकारमध्ये भाजप बरोबर सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा मुलाहिजा न बाळगता खरमरीत टीका केली. 'पडळकरांचं वक्तव्य भाजपच्या संस्कृतीला शोभणारं नाही' असे अमोल मिटकरी म्हणाले
आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला प्रश्न विचारले जात होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणावर भाष्य केलं. पडळकरांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. जर चांगला नेता व्हायचं असेल तर असली वक्तव्ये ठीक नाहीत, अशा शब्दात त्यांनी पडळकरांना सुनावलं.
advertisement
मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतरही गोपीचंद पडळकरांनी माफी मागितलीच नाही. उलट त्यांची मग्रुरीरीच पुन्हा पाहायला मिळाली. पंतप्रधान मोदींच्या आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले तेव्हा पवारांनी निषेध केला होता का असे म्हणत आपला हेकेखोरपणा पडळकरांनी दाखवला.
गोपीचंद पडळकरांसारखे आमदार अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करतात, तर कधी त्यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी करतात. यामुळे राज्य सरकारची डागाळत चालली आहे. असं असतानाही सत्ताधारी मात्र बोटचेपी भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोपीचंद पडळकर मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नाही? मग्रुरी कायम! त्यांना पाठिंबा कुणाचा?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement