TRENDING:

Sadabhau Khot : काल शरद पवार, आज संजय राऊत.., सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली

Last Updated:

Sadabhau Khot Controversial Statement : शरद पवार यांच्यावर केलेल्या अभद्र टीकेमुळे वाद सुरू असतानाच सदाभाऊ खोत यांची जीभ पुन्हा घसरलीय. आता संजय राऊत यांच्यावर सदाभाऊंनी खालच्या पातळीची टीका केलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
असिफ मुर्सल, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सदाभाऊ खोत : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर वातावरण तापलं आहे. शरद पवारांवरील टीकेवरून सुरू झालेला वाद थांबला नसतानाच सदाभाऊ खोत यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर अभद्र शब्दात टीका केलीय. २४ तासात दोन वादग्रस्त वक्तव्ये केल्यानं सदाभाऊ खोत आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.

advertisement

शरद पवार यांच्या आजारपणावरून सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती. तर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली. संजय राऊत यांंनी कुत्र्याची उपमा दिली पण कुत्रा इमानदार असतो, तो धन्याची राखण आणि संरक्षण करतो हे त्यांना माहिती नसेल असं सदाभाऊ खोत म्हणाले.

BJP on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची 'ही' सवय सुटली नाही, वचननाम्यावरून भाजपचा टोला

advertisement

सदाभाऊ खोत यांनी म्हटलं की, संजय राऊतला गावगाडा माहिती नाही, शेतकऱ्याचा राखणदार कुत्रा याचा मागमूस असायचा पताच नाही. कुत्रा इमानदार असतो. धन्याची राखण करतो. तशी आम्ही आमच्या धन्याची इमाने इतबारे राखण करत आहे. २०१४ मध्ये मोदींचा फोटो गळ्यात अडकवून मतांचा जोगवा मागत गावोगावी हिंडत होता. २०१९ मध्येही तुम्ही भाषणं करत होता.

advertisement

सत्तेत येताच पहिला खंजीर हातात घेतला. तुमच्यात इमानदारपणा आहे का शोधा, कुत्र्याएवढा जरी तुमच्यात इमानदारपणा असता तरीसुद्धा महाराष्ट्रानं कौतुक केलं असतं. परंतु मला त्यांच्यावर जास्त बोलावं अशं वाटत नाही. डुकराला कितीही साबण शाम्पू लावला तरी डुक्कर गटारातच जात असतं अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. आता या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sadabhau Khot : काल शरद पवार, आज संजय राऊत.., सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल