advertisement

BJP on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची 'ही' सवय सुटली नाही, वचननाम्यावरून भाजपचा टोला

Last Updated:

BJP on Shivsena UBT Manifesto : शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

News18
News18
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १० आश्वासनांचा वचननामा जाहीर केला. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषदेत वचननाम्याची घोषणा केली. यावरून आता भाजपने उद्धव ठाकरेंना टोला लगावला असून अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला असं म्हटलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं तर उद्धव ठाकरेंच्या समोर फक्त कुटुंब आहे.  उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो असा टोलाही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
advertisement
अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
advertisement
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
वचननाम्यातील काही महत्त्वाची आश्वासने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. ते म्हणाले की, वचननाम्यात आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचं गृहनिर्माण ठरवणार आहे. मुंबईसारख्याच काही झोपडपट्ट्या इतर शहरात आहेत. त्यांचा विकास कऱणार आहे. मुंबईतलं पळवलेलं वित्तीय केंद्र धारावीत उभारू. मुंबई आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांसाठी नोकरी कुठे आहे? मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देऊ. तसंच पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार असल्याचं आश्वासन ठाकरेंनी दिलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची 'ही' सवय सुटली नाही, वचननाम्यावरून भाजपचा टोला
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement