TRENDING:

'काही पोटात घ्यायचं, पण पडळकर हे लंबी रेस का घोडे' सदाभाऊ खोतांकडून मित्राचं कौतुक

Last Updated:

गोपीचंद पडळकर हे माझे सहकारी आहेत. निश्चितपणाने त्याने जे आदरणीय बापूंच्या विषय वक्तव्य केलं त्याचं समर्थन होऊ शकत नाही. परंतु त्यांना बोलण्याची ही भूमिका का निर्माण झाली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: या ना त्या बेताल वक्तव्यामुळे नेहमी वादात सापडणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन केलं नाही. तर दुसरीकडे,  'गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करत नाही. पण राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. त्या ओठावर न आणता पोटात घालायला शिकावं. "पडळकर हे लंबी रेस का घोडे आहेत" असं सदाभाऊ खोतांनी कौतुकचं केलं आहे.
News18
News18
advertisement

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर एकही टीकेची संधी सोडत नाही. आता पडळकर अडचणीत सापडल्यानंतर सदाभाऊ खोत हे मदतीसाठी धावून आले आहे. "गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करत नाही. पण, असं करण्यासाठी का भाग पाडलं याच्या खोलात ही जाण्याची गरज आहे. 'गोपीचंद पडळकर लंबी रेस का घोडा आहे'. पण राजकारणात अशा काही गोष्टी होत असतात, त्या पोटात घालायच्या असतात, ओठावर आणायच्या नसतात' असा सल्ला सदाभाऊ खोत यांनी आपल्या मित्राला दिला.

advertisement

'राजाराम बापू पाटील एक आदर्श नेतृत्व या राज्यामध्ये होतं. निश्चित काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजे त्या सगळ्यांनी, जी माणसं या राज्याच्या विकासामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यांच्याविषयी बोलत असताना आदरयुक्तपणा असायला पाहिजे असं निश्चितच मत आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे माझे सहकारी आहेत. निश्चितपणाने त्याने जे आदरणीय बापूंच्या विषय वक्तव्य केलं त्याचं समर्थन होऊ शकत नाही. परंतु त्यांना बोलण्याची ही भूमिका का निर्माण झाली, याचाही कुठेतरी तळाशी मुळाशी जाण्याची गरज आहे, असा सूरही खोतांनी लगावला.

advertisement

'अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये उथळपणाण निश्चितपणाने पुढे जाण्याची मोठी शर्यत लागलेली आहे. जर विस्थापितांच्या लेकरा बाळांना जर तुम्ही कमी लेखलं तर ती लेकरं बाळ निश्चितपणाने आक्रमकतेने पुढे येतात त्याचे उदाहरण म्हणजे, आमदार गोपीचंद पडळकर आहे. त्यांच्यावर अनेक खोट्या गुन्ह्यात अडकण्याचा प्रयत्न केला, एका गाव गाड्यांमध्ये असे भांडण होतात. सगळे जर त्याला मंगळसूत्र चोर बनवायला लागले. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातल्या स्वतःला जे ज्येष्ठ म्हणनाऱ्यांना तुमच्या तर तोंडातली असली भाषा शोभते का ? असा सवाल ही उपस्थित केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'काही पोटात घ्यायचं, पण पडळकर हे लंबी रेस का घोडे' सदाभाऊ खोतांकडून मित्राचं कौतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल