उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं तर उद्धव ठाकरेंच्या समोर फक्त कुटुंब आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो असा टोलाही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
advertisement
अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
वचननाम्यातील काही महत्त्वाची आश्वासने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. ते म्हणाले की, वचननाम्यात आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचं गृहनिर्माण ठरवणार आहे. मुंबईसारख्याच काही झोपडपट्ट्या इतर शहरात आहेत. त्यांचा विकास कऱणार आहे. मुंबईतलं पळवलेलं वित्तीय केंद्र धारावीत उभारू. मुंबई आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांसाठी नोकरी कुठे आहे? मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देऊ. तसंच पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार असल्याचं आश्वासन ठाकरेंनी दिलं.