सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवून शिंदे भाजपवर दबाव आणत असल्याची माहिती आहे. त्यांनी अडीच वर्षे महापौरपद मिळावं, यासाठी भाजपकडे मागणी केली आहे. शिंदेंच्या या मागणीनंतर भाजपची अडचण निर्माण झाली. यानंतर भाजपनं एकनाथ शिंदेंशिवाय मुंबईत सत्ता स्थापन करण्याचे देखील प्रयत्न केल्याची माहिती आहे. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंशी देखील संवाद साधला होता. पण आता या सगळ्या राजकीय घडामोडींत मोठा ट्विस्ट आला आहे.
advertisement
मुंबईच्या महापौर पदावरून भाजप एक पाऊल मागे आल्याची माहिती आहे. मनाचा मोठेपणा करत भाजप मुख्यमंत्री पदाप्रमाणे मुंबईचं महापौर पद देखील एकनाथ शिंदे यांना देणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंना वाटाघाटीत यश आलं असून अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांकडून एकमत झाल्याची माहिती महायुतीतील सूत्रांकडून देण्यात आली आहे.
महापौर पद शिंदे गटाला देण्याची भाजपनं तयारी दर्शवली असली तरी तिजोरीच्या चाव्या भाजप आपल्याकडे ठेवणार आहे. शिंदे गटाला महापौर पद आणि स्थायी समिती सभापती पद भाजपाकडे राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महापालिका निकाल लागल्यापासून मुंबईत कुणाचा महापौर बनणार? याबाबत जो सस्पेन्स निर्माण झाला होता. आता हा सस्पेन्स संपल्याचं बोललं जातंय.
