महाराष्ट्रासह देशाचे लक्ष मुंबई महानगर पालिका निवडणुकीकडे लागले आहेत. यंदा प्रथमच ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांचे आव्हान सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसेनेपुढे आहे. मुंबईतील प्रत्येक लढाई निकराची होणार असल्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. असे असताना एकाएका मताची किंमत जाणून राजकीय पक्ष मतदारांपर्यंत थेटपणे पोहोचून आपले मुद्दे मांडत आहेत.
advertisement
शिंदेसेनेच्या उमेदवाराचा मातोश्रीबाहेर प्रचार
मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात प्रभाग क्रमांक ९३ चे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुमित वजाळे यांनी मूळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेरच गुरूवारी प्रचार केला. आम्ही प्रचारासाठी आलेलो आहोत. याच प्रभागातून आम्ही निवडणूक लढवतो आहे. मतदारांना भेटण्यासाठी आमचे मुद्दे पटवून देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. ठाकरे कुटुंबातले कुणीही भेटले तरीही चालेल, अशी विनंती सचिन वजाळे यांनी मातोश्रीबाहेरील सुरक्षारक्षकांना सांगितले.
सुमित वजाळे हे शिवसेनेच्या झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष आहेत. गेल्या वेळी आरपीआयकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. दुसऱ्या क्रमांकांची मते त्यांना मिळाली होती. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना ९३ क्रमांकाच्या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गट आमने सामने आहेत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आक्रमक आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशा वेळी प्रभाग क्रमांक ९३ चे शिवसेना उमेदवार सुमित वजाळे यांनी थेट मातोश्रीवरच प्रचार मोहीम काढल्याच्या कृतीची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात होत आहे.
कोण आहेत सुमित वजाळे?
सुमित वांजळे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत
प्रभाग क्रमांक ९३ मधून एकनाथ शिंदे यांनी सुमित वांजळे यांना उमेदवारी दिली आहे
गेल्या वेळी आरपीआयकडून निवडणूक लढवली, दुसऱ्या क्रमाकांची मते त्यांना मिळाली होती
सुमित वांजळे यांच्यासमोर रोहिणी कांबळे यांचे आव्हान आहे
प्रभाग क्रमांक ९३ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो
या बालेकिल्ल्यात शिंदेसेनेचे वांजळे आपले नशीब आजमावत आहेत
