मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. गेल्या काही निवडणुकांमधील मतमोजणीदरम्यान झालेला गोंधळ टाळण्यासाठी, आता एकाच वेळी सर्व वॉर्डांची मतमोजणी न करता ती दोन वॉर्डची मतमोजणी करण्यात येणार आहे. शहरात एकूण २३ मतमोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक केंद्रावर साधारण दहा प्रभागांची जबाबदारी एका मतमोजणी अधिकाऱ्याकडे असणार असली, तरी एका वेळी केवळ दोनच प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच वेळी जास्तीत जास्त ४६ प्रभागांचेच मतमोजणीचे काम सुरू राहणार आहे.
advertisement
> सुरुवातीचे महत्त्वाचे कल काय?
सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची (Postal Ballots) मोजणी करण्यात आली. शिवडी, दादर आणि माहिम यांसारख्या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात 'ठाकरे-राज' युती आणि शिंदे गटात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे
महायुती (भाजप + शिवसेना शिंदे गट): सुरुवातीच्या टप्प्यात २० जागांवर आघाडीवर.
ठाकरे बंधू युती (शिवसेना UBT + मनसे + राष्ट्रवादी SP): १३ जागांवर चुरशीची लढत.
काँग्रेस व इतर: ५ जागांवर आघाडीवर.
निकालाचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी क्लिक करा...
BMC Election Result Live: ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये टफ फाइट, मतमोजणीच चुरस
