वॉर्ड क्रमांक १८३ मध्ये काँग्रेसच्या आशा काळे यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा १४५० मतांनी पराभव केला. शिंदे गटाने या वॉर्डमधून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे शेवाळे यांना हा मोठा धक्का आहे. वैशाली शेवाळे या माजी नगरसेविका आहेत. ठाकरे गट आणि मनसेच्या पारुबाई कटके यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.
advertisement
वर्षा गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात यश...
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना आपल्या बालेकिल्ल्यात पहिलं यश मिळालं आहे. धारावी हा काँग्रेस आणि गायकवाड कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. याच वॉर्डमधून काँग्रेसने आपल्या विजयाचा गुलाल उधळला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 11:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: मुंबईत मोठा उलटफेर, पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने, शिंदेंच्या बड्या नेत्याच्या वहिनीला धूळ चारली
