पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी सोडत काढली जाईल. दुसऱ्या टप्प्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गासाठी सोडत निघेल. त्याशिवाय, या सर्व प्रवर्गांमध्ये आणि खुल्या गटातही ५० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित केली जातील.
> मुंबई महापौर पदासाठी कोणाला आरक्षण?
आजच्या महापौर पदाच्या सोडतीसाठी सगळ्यांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या सोडतीकडे होते. आज सकाळी मंत्रालयात काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये मुंबईसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघाली. मुंबईत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. त्यामुळे आता महापौर पदासाठीची चुरस आणखी वाढणार आहे.
advertisement
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक घोडदौड करत शिवसेनेच्या (ठाकरे गट) २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीने ११८ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले असून, ८९ जागा जिंकून भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामुळे मुंबईला भाजपचा पहिला 'मराठी महापौर' मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
>> आठ ठिकाणी ओबीसी महापौर असणार
आजच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत ओबीसी प्रवर्गाातील नगरसेवक आठ ठिकाणी असणार आहेत. यामध्ये पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव या महापालिकांचा समावेश आहे. यापैकी जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर, अकोला या ठिकाणी ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.
इतर संबंधित बातमी:
२९ महापालिकांचे 'कारभारी' ठरले! महापौरपदाचे आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या शहरात कोणाची वर्णी?
