दरम्यान, पुण्यातल्या धायरी परिसरात बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. इथं बाहेरून काही महिलांना आणून मतदान करून घेतलं जात आहे. शिवाय एका विशिष्ट लिक्विडचा वापर करून शाई देखील पुसली जात आहे. ही शाई पुसून पुन्हा या महिला मतदान करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
धायरी परिसरातील एका बुथवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित बोगस मतदान करणाऱ्या महिलेला पकडलं आहे. तिच्याकडून बोटावरील शाई पुसण्यासाठी वापरण्यात येणारं लिक्विड जप्त केलं आहे. कार्यकर्त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून संबंधित लिक्विड देखील पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
advertisement
याबाबत प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, प्रशासन कमी पडत आहे. प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यायला हवं होतं
काही महिला बोटाची शाई पुसून पुन्हा पुन्हा त्याच महिला मतदानाला जात आहेत. पण पुण्यात राष्ट्रवादीचाच महापौर होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
