या नवीन सेवेमुळे मुंबई (बोरिवली) आणि नाशिक दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी मिळाली आहे. ही बससेवा पर्यावरणपूरक सेवेकडे वाटचाल करताना दिसत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शाश्वत वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी एकूण 65 इलेक्ट्रिक बसेस आपल्या प्रवासी सेवेत समाविष्ट केल्या आहेत. या बसेस नाशिक- बोरीवली, नाशिक- छत्रपती संभाजीनगरसह इतर प्रमुख मार्गावर सेवा देत आहेत.
advertisement
बोरिवली-नाशिक मार्गावर गुरुवार, दिनांक 04-12-2025 पासून नवीन फेऱ्या सुरू होत आहेत. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि त्यांना उत्तम सेवा देण्यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर केला जात आहेत. सुरु करण्यात आलेल्या नवीन फेऱ्या गुरुवार, दिनांक 04-12-2025 पासून सुरू होत आहे. एकूण 22 फेऱ्या होणार आहेत. नाशिक बोरिवली मार्गावर 11 फेऱ्या येऊन आणि जाऊन अशा एकूण 22 फेऱ्या होणार आहेत.
बोरिवली- नाशिक मार्गावर, सकाळी 05:00, 07:00, 08:00, 09:00, 10:00, 11:00, दुपारी 12:30, 01:30, 02:30, 03:30 आणि सायंकाळी 05:00 अशा वेळी बोरिवली बस स्थानकावरून बस धावणार आहे. बससाठी पूर्ण तिकिट 509 रूपये असेल आणि महिलांसाठी 266 रूपये तिकिट असणार आहे. महिलांसाठी बसचं तिकिट अर्धेच असेल. नाशिक- बोरिवली मार्गावर, सकाळी 05:00, 07:00, 08:00, 09:00, 10:00, दुपारी 12:30, 01:30, 02:30, 03:30 सायंकाळी 04:30 आणि 05:30 अशा वेळी नाशिक बस स्थानकावरून बस धावणार आहे. बससाठी पूर्ण तिकिट 509 रूपये असेल आणि महिलांसाठी 266 रूपये तिकिट असणार आहे. महिलांसाठी बसचं तिकिट अर्धेच असेल.
महत्त्वपूर्ण सेवेचे उद्घाटन नाशिकचे जिल्हाधिकारी, आयुष प्रसाद (I.A.S.) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी विजय गिते, प्रादेशिक व्यवस्थापक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक प्रदेश- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभाग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उपरोक्त बस फेऱ्या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळ npublic.msrtcors.com वर ऑनलाईनसाठी व MSRTC mobile reservation app वर आगाऊ आरक्षणाला उपलब्ध आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आधुनिक, शाश्वत वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे.
